Netflix Free : दोन दिवसांसाठी पुन्हा नेटफ्लिक्स मोफत, असा करा अॅक्सेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:47 PM2020-12-09T15:47:55+5:302020-12-09T16:46:25+5:30

नेटफ्लिक्सने (Netflix) अलीकडेच स्ट्रीम फेस्ट (Stream Fest) अंतर्गत भारतात दोन दिवसांसाठी फ्री नेटफ्लिक्स (Free Netflix) दिला आहे.

आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, पुन्हा एकदा दोन दिवस नेटफ्लिक्स विनामूल्य दिसू शकेल.

नेटफ्लिक्स स्ट्रीम फेस्ट (Netflix Stream Fest) अंतर्गत 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर 8.59 AM पर्यंत लोकांना मोफत नेटफ्लिक्स अॅक्सेस देण्यात येत आहे. यापूर्वी 5-6 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स विनामूल्य करण्यात आले होते.

यावेळी सुद्धा नेटफ्लिक्स स्ट्रीम फेस्ट अंतर्गत मोफत नेटफ्लिक्स पाहण्यासंबंधीचा नियम तशाच राहतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सवर साइन अप करावे लागेल.

तुम्ही आधीपासूनच नेटफ्लिक्सचे सब्सक्राइबर असल्यास तुमच्यासाठी हे नाही आहे. नेटफ्लिक्स ग्राहक नसल्यास तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

नेटफ्लिक्स स्ट्रीम फेस्ट अंतर्गत विनामूल्य नेटफ्लिक्सचा कंटेंट पाहण्यासाठी आपल्याला कार्ड डिटेल्स देण्याची देखील आवश्यकता नाही. मात्र, ईमेल आयडी आणि फोन नंबरसह आवश्यक माहिती देऊन अकाऊंट तयार करावे लागेल.

नेटफ्लिक्स स्ट्रीम फेस्ट अंतर्गत तुम्ही फक्त नेटफ्लिक्स SD मध्ये म्हणजेच स्टँडर्ड डेफ़िनिशन पाहू शकता. एचडी किंवा फुल एचडीचा ऑप्शन येथे उपलब्ध होणार नाहीत.

नेटफ्लिक्सच्या मते स्ट्रीम फेस्ट अंतर्गत मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, क्रोमकास्ट, ब्राउझर, गेमिंग कन्सोलद्वारे सुद्धा कंटेंट पाहिला जाऊ शकतो.

नेटफ्लिक्स फ्लिक्स स्ट्रीम फेस्ट अंतर्गत युजर्सला जवळपास सर्व फीचर्सचा अॅक्सेस मिळेल, जो प्रिमियम युजर्संना मिळतो. यामध्ये प्रोफाइल तयार करण्यापासून रेस्ट्रिक्शनचे फीचरचा समावेश आहे.

नेटफ्लिक्स स्ट्रीम फेस्ट अंतर्गत आपण विनामूल्य कंटेंट पाहण्यासाठी Netflix.com/StreamFest वर टॅप करू शकता.