never try to search these things on google you may be in jail
गुगलवर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 03:37 PM2019-01-03T15:37:30+5:302019-01-03T16:05:48+5:30Join usJoin usNext गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने वर्षभर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण प्रत्येकवेळी गुगलवर ती पटकन सर्च करतो. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र गुगलवर काही गोष्टी सर्च करणं महागात पडू शकतं. 'या' गोष्टींबाबत जाणून घेऊया. गुगलवर बॉम्ब तयार करण्याची पद्धत अथवा बॉम्बबाबत काही संशयास्पद गोष्टी सर्च केल्यास तुरुंगाची हवा खावी लागेल. कारण क्राईम आणि सायबरची अशा गोष्टींवर सतत नजर असते. त्यामुळे अशा गोष्टी सर्च करू नका. गुगलवर अनेक लोक पॉर्न व्हिडीओ सर्च करत असतात. मात्र चाइल्ड पॉर्न सर्च करत असाल तर तुम्हाला हे अत्यंत महागात पडू शकतं. गुगलवर अनेकदा विविध औषधांबाबतच्या गोष्टी सर्च केल्या जातात. मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता तुम्ही केवळ माहिती शोधून एखादं औषध घेत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एखादं ठिकाण सर्च करण्यासाठी गुगलची मदत हमखास घेतली जाते. मात्र कधी कधी तुमच्या घराचा पत्ता टाकून सर्च करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे अशा गोष्टी सर्च करू नका. टॅग्स :गुगलgoogle