'या' आहेत जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:50 AM2019-10-27T11:50:15+5:302019-10-27T11:55:47+5:30

सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामचा वापर कोट्यवधी युजर्स करत आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट्सबाबत जाणून घेऊया. 

सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट म्हणून फेसबुक सर्वांनाच माहीत आहे. फेसबुकचे 238 कोटी मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. 

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा वापर हा प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी ट्विट करण्यासाठी केला जातो. ट्विटरचे 32.1 कोटी मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहे. 2006 मध्ये सुरू झालेल्या ट्विटरवर महत्त्वाच्या व्यक्तींना फॉलो करता येतं. 

सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टाग्रामचे 100 कोटी मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत. 

2011 मध्ये सुरू झालेली स्नॅपचॅट सर्व्हिसचे 33 कोटी पेक्षा अधिक मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. तरुणाईमध्ये हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. 

प्रोफेशनल लोकांसोबत कनेक्ट होण्यासोबतच नवीन जॉब्स ओपनिंगपर्यंत युजर्सना जॉईन करणं हा लिंक्डइनचा उद्देश आहे. लिंक्डइनचे 30.3 कोटी मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. 

2010 मध्ये पिनट्रेस्टची सुरुवात झाली असून त्यावर वेगवेगळ्या विषयांशी संबंधित पिन्स आणि व्हिज्युअल्स युजर्सना मिळतात. यावरील फॅशन, फूड, डेकोरोशन आणि वर्कआऊटसारखे विषय लोकप्रिय आहेत. 

2005 मध्ये सुरू झालेलं रेडिट सर्वात जास्त व्हिजिट केल्या जाणाऱ्या टॉप 20 साईट्समधील एक आहे. यावर 150,000 हून अधिक कम्युनिटीज आणि 33 कोटी मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.