आता BSNL नेटवर्कवर 5G चालणार...! ही एक डील Jio-Airtel चें टेन्शन वाढवणार अन् झोपही उडवणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 03:28 PM 2024-07-30T15:28:30+5:30 2024-07-30T15:37:12+5:30
ही डील बीएसएनएलला नवसंजीवनी देऊ शकतो... दूरसंचार क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL सध्या आपल्या 4G नेटवर्कच्या विस्तारावर वेगाने काम करत आहे. मात्र, Jio आणि Airtel चा विचार करता, या कंपन्या ग्राहकांना 5G नेटवर्क ऑफर करत आहेत. असे असतानाच, आता बीएसएनएलला एक जबरदस्त डील मिळाली आहे. ही डील बीएसएनएलला नवसंजीवनी देऊ शकतो.
या डिल अंतर्गत, बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरचा वापर करून 5G सेवा ऑफर केली जाईल. यामुळे जिओ आणि एअरटेलचे टेन्शन वाढणार आहे. याच बरोबर, मोबाईल युजर्सना स्वस्त दरात हायस्पीड डेटा आणि कॉलिंग सुविधा मिळणे अपेक्षित आहे.
या शहरांमध्ये सर्वात पहिले ट्रॉयल - यासंदर्भात एका देशांतर्गत टेलिकॉम स्टार्टअपची BSNL सोबत चर्चा सुरू आहे. जी BSNL नेटवर्कचा वापर करून 5G सोवा देण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनी ट्रॉयल सेवा सुरू करण्याचा प्लॅन आखला आहे.
ही ट्रॉयल सेवा एक ते तीन मिहिन्यांत सुरू होऊ शकते. यात नॉन पब्लिक नेटवर्कवर लक्ष्य केंद्रित करण्यात येईल. या प्रोजेक्टअंतर्गत सुरुवातीला बीएसएनएल होल्डिंग 700MHz बँडचा विस्तार करण्यात येईल. ही ट्रायल दिल्ली, बेंगलोर, चेन्नई सारख्या लोकेशनवर घेतली जाईल.
या लोकेशनवर होणार ट्रायल - ज्या लोकेशनवर 5G ट्रायलचा प्लॅन आहे, त्यांत दिल्ली, बेंगलोर आणि चेन्नईतील काही निवडक ठिकानांचा समावेश आहे. यात दिल्लीतील कनॉट प्लेस, संचार भवन, जेएनयू कॅम्पस, आयआयटी आणि इंडिया हॅबिटेट सेंटर, बेंगलोरमधील सरकारी इंडोर ऑफिस आणि सरकारी ऑफिस, गुरुग्राम मधील सिलेक्टेड लोकेशन, तसेच हैदराबादमधील आयआयटीचा समावेश आहे.
बीएसएनएलकडून 5G ट्रॉयलला संपूर्ण सपोर्ट दिला जाणार आहे. यासाठी कंपनी स्पेक्ट्रम, टॉवर, बॅटरी, पॉवर सप्लाई आणि इतर इंफ्रॉस्ट्रक्चर देण्यासाठी तयार आहे.
व्हॉइस ऑफ इंडियन कम्यूनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेस (VoICE) नुसार, कंपनी 5G ट्रायल पब्लिक यूजसाठी देण्यास तयार आहे. या प्रकरणात VoICE ची BSNL च्या CMD सोबत एक बैठकही झाली आहे.
काय आहे VoICE - ही स्वदेसी टेलिकॉम कंपन्यंची एक ग्रुप इंडस्ट्री आहे. यात TCS, तेजस नेटवर्क, VNL, यूनायटेड टेलिकॉम, कोरल टेलिकॉम आणि HFCL चा समावेश आहे.