1TB मेमरी, 16GB रॅम! एक नंबर स्पेसिफिकेशन्सनी ठासून भरलेला Nubia Z40 Pro लाँच; इतकी आहे किंमत By सिद्धेश जाधव | Published: February 25, 2022 07:35 PM 2022-02-25T19:35:08+5:30 2022-02-25T19:39:54+5:30
Nubia नं चीनमध्ये टॉप ऑफ द लाईन स्पेक्ससह Nubia Z40 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 64MP कॅमेरा, 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. डिस्प्ले Nubia Z40 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 कलर गमुट आणि 1000 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
परफॉर्मन्स Nubia Z40 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळतो. सोबत 8GB, 12GB व 16GB रॅमचे पर्याय मिळतात. तर 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड मायओएस 12 वर चालतो.
कॅमेरा Nubia Z40 Pro मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 1/1.3 इंचाचा 64MP सोनी IMX787 सेन्सर देण्यात आला आहे. जो 35mm लेन्स सारखे फोटो काढतो सोबत OIS सपोर्ट आहे. त्याचबरोबर 50MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 5X ऑप्टिकल झूमसह 8MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा सेन्सर आहे. यात 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी Nubia Z40 Pro स्मार्टफोन मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंगला सपोर्टसह येणारा पहिला अँड्रॉइड आहे. हे फिचर 4600mAh बॅटरी असलेल्या Gravity Edition मध्ये मिळतं. अन्य व्हेरिएंट 5000 mAh बॅटरी आणि 80W फास्ट वायर्ड चार्जिंगसह आले आहेत.
कनेक्टिव्हिटी Nubia Z40 Pro स्मार्टफोनमध्ये USB 3.1 पोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये NFC सपोर्ट देखील देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी कंपनीनं इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
किंमत Nubia Z40 Pro स्मार्टफोन ब्लॅक आणि सिल्वर अशा दोन रंगात सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस 2 मार्चपासून चीनमध्ये उपलब्ध होईल. भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.