नवीन फोन घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा; पुढील आठवड्यात येणारे 7 दणकट फोन बदलतील तुमचा निर्णय By सिद्धेश जाधव | Published: April 23, 2022 07:09 PM 2022-04-23T19:09:21+5:30 2022-04-23T19:16:46+5:30
भारतात पुढील आठवड्यात अनेक दणकट स्मार्टफोन्स सादर केले जाणार आहेत. जर तुम्ही नवीन मोबाईल घेणार असाल तर या आगामी डिवाइसेजवर तुम्ही एक नजर टाकलीच पाहिजे. यात काही फ्लॅगशिप आणि बजेट स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. Realme Narzo 50A Prime (25 एप्रिल) या 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. हा फोन अँड्रॉइड 11 आणि Unisoc T612 चिपसेटसह बाजारात येणार आहे एलईडी फ्लॅशसह 50MP + 2MP + 2MP असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह 5,000एमएएच बॅटरी आणि 18वॉट फास्ट चार्जिंग मिळेल.
Motorola Moto G52 (25 एप्रिल) या फोनमध्ये 6.6 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेशसह मिळेल. हा अँड्रॉइड 12 डिवाइस क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात आयपी52 रेटिंग मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO Z6 Pro (27 एप्रिल) स्मार्टफोनमध्ये OLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. . प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G चिपसेट मिळेल. iQOO Z6 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. सोबत 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बॅटरी मिळेल.
Xiaomi 12 Pro 5G (27 एप्रिल) यात 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह मिळेल. हा अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटसह येईल ज्यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मिळू शकते. यातील 4,600एमएएच बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सोबत 50MP + 50MP + 50MP कॅमेरा सेटअप मिळेल. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OnePlus 10R (28 एप्रिल) हा स्मार्टफोन 120hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात येईल. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट, 12 जीबी रॅम आणि Android 12 मिळेल. यात 50MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप मिळेल. 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह या फोनमध्ये 4500mAh बॅटरी 150W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.
OnePlus Nord CE 2 Lite 5G (28 एप्रिल) हा 6.59-इंचाच्या फुल एचडी+ एलसीडी 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटसह 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळेल. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP प्रायमरी सेन्सर, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा मोनो सेन्सर असेल. डिवाइसच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर असेल. हँडसेटमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.
Realme GT Neo 3 (29 एप्रिल) फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. अँड्रॉइड 12 वर चालणारा हा डिवाइस मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि माली जी610 जीपीयूसह येईल. यात 6.7 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळेल. यात 4,500एमएएचची बॅटरी 150वॉट फास्ट चार्जिंगसह मिळेल.