OnePlus 13R Review...! दोन दिवस पुरणारी मोठी बॅटरी, कॅमेराही बदललेला; प्रोसेसरही नवा, कसा वाटला...
By हेमंत बावकर | Updated: January 30, 2025 18:53 IST2025-01-30T18:45:51+5:302025-01-30T18:53:53+5:30
OnePlus 13R Detailed Review in Marathi: गेमिंग, फोटोग्राफीवेळी तापणारा असा ख्याती असलेल्या प्रोसेसरची पुढची पिढी, ६००० एमएएचची बॅटरी पण जड आहे की हलका... पहा कॅमेराची क्वालिटी...

वनप्लस या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने नुकतेच दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यापैकी वनप्लस १३ आर (OnePlus 13R) लोकमत ऑनलाईनकडे रिव्हूसाठी आला होता. सध्याचे सूर्याचे उत्तरायण, वाढलेली उष्णता, फोटोग्राफी आणि कॅमेरासह स्मार्टफोनमधील लेटेस्ट प्रोसेसरचा परफॉर्मन्स आम्ही चेक केला. वजनदार असला तरी त्याचे वजन हाताला जाणवत नाही, असा हा फोन आम्हाला कसा वाटला जाणून घेऊया.
वनप्लस १३ आरमध्ये फ्लॅट अॅल्युमिनिअम फ्रेमचा वापर करण्यात आली आहे. वनप्लस ८ आरमध्ये देखील होती, त्या फोनमध्ये रेंज खेचण्याची समस्या होती. ती या नव्या फोनमध्ये आली नाही. अॅल्युमिनिअम बॉडी असल्याने मध्ये मध्ये बॉडीला रेंज खेचण्यासाठी रबर असलेल्या खाचा दिल्या आहेत.यामुळे कॉलिंगमध्ये अडथळा आला नाही.
पाठीमागे गोलाकार भागात वनप्लसचा फ्लॅगशिप कॅमेरा सेटअप आहे. कॅमेराचे बोलायचे झाले तर सेल्फी १६ मेगापिक्सल सेन्सरद्वारे अत्यंत क्लिअर येत आहेत. तसेच पाठीमागे Sony LYT 700 चा मेन सेन्सर दिला आहे. जो चांगले फोटो काढतो. फोटोग्राफीसाठी हा एक चांगला परवडणारा पर्याय आहे. रात्रीच्या वेळीही चांगले डिटेल्स असलेले फोटो काढता येतात. फुलांचे वगैरे रंग थोडे ब्राईट वाटतात. बहुतांश वेळा नॅचरल कलर टोन मिळतो.
स्मार्टफोनचे फंक्शनिंग स्मूथ होण्यासाठी Qualcomm Snapdragon 8 Gen 3 देण्यात आला आहे. यामुळे अॅप टू अॅप जाण्यासाठी मख्खनसारखा फिल येतो. कुठेही लॅग जाणवत नाही. महत्वाचे म्हणजे कॅमेरा वापरताना हा फोन तापलेला वाटला नाही. गेम खेळतानाही काहीसा गरम वाटला परंतू चिंता करण्याएवढा नाही. या फोनमध्ये LPDDR5X ची १६ जीबी रॅम देण्यात आली आहे.
बॅटरी...
या फोनमध्ये ६००० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी नेहमीचे कॉल, व्हिडीओ आणि कॅमेरा, गाणी ऐकण्यासारख्या वापरासाठी दोन दिवस आरामात येते. ८० वॉटचा चार्जर देण्यात आला आहे जो ही बॅटरी १०० टक्के चार्ज करण्यासाठी ४५ मिनिटे घेतो.
या फोनमध्ये वनप्लसचे मोड चेंज करणारे स्लायडर बटन देण्यात आलेले आहे. आमच्याकडे आलेला फोन हा ग्रे कलरचा होता. जो दिसायला छान वाटत होता. सोबत सिलिकॉन केसही होती. फक्त टाईप सी पोर्ट देण्यात आलेला आहे. यामुळे गाणी ऐकण्यासाठी एकतर ब्लुटुथ किंवा टाईप सी असलेला हेडफोन वापरावा लागणार आहे.
एआयचा वापर...
हा फोन एआयने युक्त आहे. फोटोवरील एआय डिटेल बुस्ट, अनब्लर, रिफ्लेक्शन रिमुव्हर आदी चांगले काम करतात. टेक्स्टिंगसाठीही या फोनवर एआय रिल्पाय आदी वापरू शकता. हे फिचर्स व्हॉट्सअप, मेल आदीसाठी वापरता येते.
डिस्प्ले...
यामध्ये एज टू एज असलेला 120Hz रिफ्रेश रेट व LTPO तंत्रज्ञानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Widevine L1, HDR10+ आणि Dolby Vision HDR व्हिडिओंना सपोर्ट करतो. Oxygen OS 15 असल्याने अन्य फिचर्सही आरामात वापरता येतात. 2780×1264 रिझोल्युशनचा हा डिस्प्ले आहे. ज्यावर कलर चांगल्या प्रकारे दाखविले जातात. व्हिडीओचे कलर बुस्टही करता येतात.
काय वाटते...
एकंदरीत ४० हजाराच्या रेंजमध्ये हा फोन चांगला आहे. लेटेस्ट प्रोसेसर, बॅटरीही दमदार आणि दिसायलाही चांगला असलेला हा OnePlus 13R बजेटमध्ये बसणारा असेल तर विचार करायला लावणारा आहे.