OnePlus 6T's McLaren Edition launch; The 10 GB RAM but the price
OnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 04:20 PM2018-12-13T16:20:10+5:302018-12-13T16:51:36+5:30Join usJoin usNext चीनची मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने परवडणारे मिडरेंज स्मार्टफोन लाँच करण्यास एकीकडे नकार दिलेला असताना आता सध्याच्या मोबाईलची वेगवेगळी मॉडेल्स काढून किंमती वाढवत आहे. OnePlus 6T हा फोन 37,999 रुपयांपासून नुकताच लाँच केलेला असताना काही दिवसांतच केवळ रंग बदललेला फोन लाँच केला आणि बुधवारी नवीन McLaren Edition लाँच केला आहे. मॅक्लॅरेन एडिशन हा फोन वनप्लसचा आजपर्यंतचा सर्वात महागडा फोन आहे. या फोनची डिझाइनही मूळ फोनपेक्षा वेगळी आहे. या फोनच्या रिअर पॅनेलवर मॅक्लॅरेनचा लोगो देण्यात आला आहे. या फोनच्या मागील पॅनेलवर ऑरेंज कलरही देण्यात आला आहे. याफोनची किंमत 50999 ठेवण्यात आली आहे. OnePlus 6T ची ही McLaren Edition अॅमेझॉनसह कंपनीच्या वेबसाईटवर 15 डिसेंबरपासून मिळणार आहे या फोनमध्ये 10 जीबी रॅम आणि 256 जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 645 प्रोसेसर देण्यात आला आहे. हाच प्रोसेसर OnePlus 6T मध्येही आहे. फोनमध्ये रॅप चार्ज हे डॅश चार्जपेक्षाही फास्ट बॅटरी चार्ज करणारे फिचर देण्य़ात आले असून आधीच्या 10 वॅटपेक्षा नवीन 30 वॅटच्या चार्जरद्वारे 10 मिनिटांत दिवसभरासाठी बॅटरी मिळू शकते. पुढील काळात वनप्लस कंपनी 5 जी फोनही लाँच करणार आहे. आधीच मिडरेंज फोन आणणार नसल्याचे कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले असताना नव्या फोनच्या किंमतीही आकाशाला भिडण्याची शक्यता आहे. जरी या किंमती अॅपलच्या नव्या फोनपेक्षा कमी असल्या तरीही फ्लॅगशिप फोन आणि सर्वात चांगला कॅमेरा देणाऱ्या गुगलच्या फोनएवढ्याच या किंमती गेल्यास ग्राहकांना विचार करावा लागणार आहे. टॅग्स :वनप्लस 6Tवनप्लस मोबाईलOneplus 6TOneplus mobile