before online transaction making a secure
अशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 05:33 PM2018-11-16T17:33:29+5:302018-11-16T17:48:42+5:30Join usJoin usNext ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी न घेतल्यास तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना काही बाबी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सुरक्षिततेसाठी ज्या ग्राहकांना ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करता येते त्यांनीच ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करावे. एसबीआयने सांगितले आहे की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेज (यूपीआई) म्हणजेच इंटर-बैंक ट्रान्झॅक्शनसाठी इन्स्टट रियल टाइम पेमेंट सिस्टिमच्या माध्यमातून व्यवहार करण्यापूर्वी ग्राहकांनी पेमेंट कलेक्ट रिक्वेस्ट तपासून पाहिली पाहिजे. सायबर कॅफेसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरून पैशांचे ट्रान्झॅक्शन चुकूनही करू नये. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांनी ओपन किंवा फ्री नेटवर्कवरून ट्रांजेक्शन करता कामा नये. ट्रान्झॅक्शन करण्यासाठी व्हेरिफाइड तसेच विश्वसनीय ब्राउजर्सचाच वापर केला पाहिजे. ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी केवळ 'https' वाल्या सिक्युअर्ड वेबसाइटचाच वापर केला पाहिजे. ग्राहकांनी आपला पासवर्ड, वन टाइम पासवर्ड (ओटीपी), पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड आणि यूपीआई पासवर्ड कुठल्याही परिस्थितीत त्रयस्त व्यक्तीला देऊ नये. टॅग्स :तंत्रज्ञानबँकिंग क्षेत्रtechnologyBanking Sector