paytm launches credit card with cash back offers
Paytm कडून क्रेडिट कार्ड लाँच, प्रत्येक ट्रांजक्शनवर मिळणार कॅशबॅक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:54 PM2020-10-19T15:54:34+5:302020-10-19T16:17:20+5:30Join usJoin usNext पेटीएम (Paytm) कंपनीने भारतात क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. या क्रेडिट कार्डवरील प्रत्येक खरेदीवर कॅशबॅक ऑफर उपलब्ध असणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनी नेक्स्ट जनरेशन क्रेडिट कार्ड लाँच केले असून पुढील १२-१८ महिन्यांत पेटीएमचे लक्ष्य २० लाख कार्ड देण्याचे आहे, असे पेटीएमने म्हटले आहे. पेटीएमच्या म्हणण्यानुसार, कंपनी क्रेडिट कार्डसाठी अनेक कार्ड देणार्या ब्रँडसोबत भागीदारी करत आहे. ज्या अंतर्गत को-ब्रँड कार्ड जारी करण्यात येतील. पेटीएम क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील डिजिटल असणार आहे. पेटीएम अॅपवर कार्डसाठी एक डेडिकेटेड सेक्शन असणार आहे. या सेक्शनमधून युजर्स कार्ड मॅनेज करू शकतात. अॅपच्या माध्यमातून तुम्ही पेटीएम क्रेडिट कार्डचा पिन बदलू शकता आणि अॅड्रेस अपडेट करून शकता. तसेच, कंपनीने म्हटले आहे की, युजर्स त्यांचे क्रेडिट कार्डला रिअल टाइम मॅनेज करू शकतील. क्रेडिट कार्डसह फसवणूक झाली तर विमा देखील दिला जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासह (ट्रान्जक्शन) ग्राहकांना कॅशबॅक मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. कॅशबॅक पेटीएम गिफ्ट व्हाउचरच्या म्हणून देण्यात येणार आहे, ज्याचा पेटीएम इकोसिस्टममध्ये वापरला जाऊ शकतो. पेटीएम क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी, कंपनी ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअर आणि पेटीएम व्यवहार इतिहास/खरेदी पॅटर्नला आधार बनवणार आहे. पेटीएम क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील डिजिटल असणार आहे. पेटीएम अॅपवर कार्डसाठी एक डेडिकेटेड सेक्शन असणार आहे. या सेक्शनमधून युजर्स कार्ड मॅनेज करू शकतात.Read in Englishटॅग्स :पे-टीएमतंत्रज्ञानव्यवसायPaytmtechnologybusiness