पेन्शनरांनो लाईफ सर्टिफिकेट जमा करायचेय, चटकन हे अॅप डाऊनलोड करा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 08:40 PM 2023-11-27T20:40:04+5:30 2023-11-28T19:51:40+5:30
How to get Life Certificate online for Pension: दर वर्षी पेंशन घेणारा व्यक्ती जिवंत आहे याचे प्रमाण सरकारला द्यायचे असते. नाहीतर पेंशन थांबविली जाते. याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. जर तुम्हाला सरकारी पेंशन मिळत असेल, तुमचे वडिलधारे व्यक्ती पेंशनवर जगत असतील तर तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण त्यांची पेंशन ३० नोव्हेंबरपासून बंद होण्याची शक्यता आहे. कारण दर वर्षी पेंशन घेणारा व्यक्ती जिवंत आहे याचे प्रमाण सरकारला द्यायचे असते. नाहीतर पेंशन थांबविली जाते. याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.
थांबा धावपळ करू नका, घाईही करू नका. ६० ते ८० वयोगटातील सर्वांनाच त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सरकारला म्हणजेच बँकेत द्यावे लागते. याची मुदत १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर अशी होती. आता फक्त तीन दिवस राहिले आहेत.
तुमच्या सोईसाठी सरकारने ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध केली आहे. ज्याव्दारे तुम्ही जिवंत आहात हे सरकारला कळवू शकता व पेंशन पुढे चालू ठेवू शकता. कसे ते पाहुयात...
यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाहीय. तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर Jeewan pramaan portal वर जाऊन तुम्ही जिवंत असल्याचे सर्टिफिकेट जमा करू शकता.
तसेच तुम्ही फेस ऑथेंटिकेशनचाही वापर करू शकता. याशिवाय तुमच्या मोबाईलवर Jeevan pramaan face App चा देखील वापर करून लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.
कसे कराल... वाचा स्टेप बाय स्टेप... सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये आधार फेसआरडी म्हणजेच जीवन प्रमण फेस अॅप डाउनलोड करावे लागेल.
यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका, जो तुम्ही पेन्शन वितरक प्राधिकरणाला दिला आहे.
यानंतर ऑपरेटर ऑथेंटिकेशनवर जा आणि फेस स्कॅन करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो क्लिक करून सबमिट करावा लागेल.
यानंतर, जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची लिंक एसएमएस लिंकद्वारे येईल, जी तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता.