Jio-Airtel-Vi चे दमदार प्लॅन्स! 300 रुपयांपेक्षा कमीत कोण देत आहे जास्त फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:15 PM2022-03-17T19:15:44+5:302022-03-17T19:21:15+5:30

देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या असलेल्या जिओ, एअरटेल आणि व्ही नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणत असते.

नवी दिल्ली: देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या, जिओ, एअरटेल आणि व्ही नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करत असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या नेहमीच नवनवीन प्लॅन्स आणतात. आज आपण या कंपन्यांच्या अशा प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी असून, त्यात डेली डेटासह विविध फायदे मिळतात.

जिओचा 249 रुपयांचा प्लॅन: 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन मिळतात. या प्लॅनची ​​वैधता 20 दिवसांची असून, यात ग्राहकांना सर्व जिओ अॅप्सची मेंबरशीपदेखील मिळते.

जिओचा 179 रुपयांचा प्लॅन: जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 24 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 1 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सची मेंबरशिप मिळते.

जिओचा 209 रुपयांचा प्लॅन: 209 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Jio अॅप्सचे अॅक्सेसही दिले जाते.

एअरटेलचा 209 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: एअरटेलच्या या प्लॅनची ​​किंमत 209 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर 21 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 1GB दैनिक डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Video ची ट्रायल मेंबरशीपदेखील दिली जाते.

एअरटेलचा 239 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: 239 रुपयांच्या बदल्यात, एअरटेल आपल्या ग्राहकांना दररोज 1GB इंटरनेट, दररोज 100 SMS आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचे फायदे देत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime Video चे मोबाईल व्हर्जन मिळते. या प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची आहे.

एअरटेलचा 265 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: एअरटेलच्या या प्लॅनची ​​किंमत 265 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 1GB दैनिक डेटा दिला जात आहे. यातही तुम्हाला Amazon Prime Video चे ट्रायल व्हर्जन दिले जाते.

Vi चा 199 रुपयांचा प्लॅन: 199 रुपयांच्या बदल्यात, Vi आपल्या ग्राहकांना दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देत आहे. या प्लानची वैधता 18 दिवसांची असून, यात Vi Movies आणि TV अॅपचा अॅक्सेस मिळतो.

Vi चा 239 रुपयांचा प्लॅन: vi च्या या प्लॅनमध्ये यूजर्सला 24 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 1GB दैनिक डेटा दिला जात आहे. या प्लानची किंमत 239 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Vi Movies & TV अॅपचे अॅक्सेस मिळते.

Viचा 269 रुपयांचा प्लॅन: 269 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचे फायदे मिळतील. यात ग्राहकांना Vi Movies & TV अॅपचा अॅक्सेस मिळेल.

हे Jio, Airtel आणि Vodafone Idea चे प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. या सर्व प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा दिला जात आहे, परंतु उर्वरित फायद्यांची तुलना करता येईल. तुमच्या आवडीनुसार, तुम्ही प्लॅनची निवड करू शकता.