Private moments shoot in camera? These apps will help you hide from others
खासगी क्षण कॅमेरात टिपलेत? इतरांपासून लपवण्यासाठी ही अॅप मदतीला येतील By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:29 PM2019-10-07T16:29:32+5:302019-10-07T16:36:57+5:30Join usJoin usNext बऱ्याच लोकांच्या स्मार्टफोनमध्ये असे फोटो असतात की जे ते इतर कोणाशी शेअर करू शकत नाहीत. काही जवळच्या व्यक्ती, खासगी एकांतातले क्षण टिपलेले असतात. हे फोटो फोनमध्ये कोणी पाहिले तर काय अशी भीती असते. यासाठी वेगवेगळे फोल्डर बनविले जातात. मात्र, एवढे उपद्व्याप करूनही हे फोटो गॅलरीमध्ये दिसतात. अनेकदा असे होते की, कोणीतरी घरातील व्यक्ती, मित्रांपेकी त्या फोल्डपर्यंत पोहोचतोच. यामुळे तुमचा खासगीपणा सार्वजनिक होण्याचा धोका वाढतो. किंवा एखादे प्रकरण बाहेर पडू शकते. काही अॅप आहेत जी सुरक्षित आणि खासगीपणा जपायला मदत करतील. कीप सेफ फोटो व्हॉल्ट अँड्रॉईड वापरणारे कीप सेफ फोटो व्हॉल्ट या अॅपद्वारे फोटो आणि व्हिडीओ हाईड करू शकतात. या अॅपचे अपडेटही मिळतात. हे लपविलेले फोटो पाहण्यासाठी पासवर्ड आणि पिनही ठेवता येतो. LockMyPix Photo Vault अॅप लॉक माय पिक्स फोटो व्हॉल्ट हे अॅपही फोटो, व्हिडीओ लपविण्यास मदत करते. या अॅपला मिलिट्री-ग्रेड एईएस कोड मिळाला आहे. यामुळे हे अॅप किती सुरक्षित असेल याचा अंदाज करा. फिंगरप्रिंट आणि शेक द डिव्हाईस फिचरही सुरक्षेसाठी दिली आहेत. मोफत व्हर्जनमध्ये काहीच फिचर मिळतात. Hide Something अॅप यामध्ये सोप्या पद्धतीने फोटो, व्हिडीओ हाईड करता येतात. अॅपमध्ये जाऊन किंवा फोटोवर शेअर करून हे फोटो सुरक्षित ठेवता येतात. तसेच इन्व्हिसीबल नावाचा फोल्ड बनवून त्यामध्येही फोटो ठेवता येतात. याशिवाय हे अॅपही लपविता येते.Vault – Hide Pics & Videos अॅप हे अॅप गुगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करता येते. या अॅपमध्येही खासगी फोटो, व्हिडीओ लपवता येतात. तसेच बॅकअपही घेता येतो.Private Zone: AppLock, Video & Photo अॅप या अॅपद्वारे फोटो, व्हिडीओ हाईड करता येतात. तसेच या खासगी डाटाचा बॅकअप बनवून तो गुगल ड्राईव्हवरही ठेवता येणार आहे.टॅग्स :अँड्रॉईडAndroid