TikTok नंतर आता PUBG मोबाइलवरही कायमस्वरुपी बंदी? By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 10:30 PM 2021-01-27T22:30:05+5:30 2021-01-27T22:51:35+5:30
भारत PUBG मोबाइलवर कायमची बंदी घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या बॅटल रॉयल गेमची भारतात एन्ट्री होणे कठीण आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) या आठवड्याच्या सुरूवातीस PUBG Corporation सह अनेक कंपन्यांना कायम बंदीसंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे असे दिसून येते की, आता कायमस्वरुपी बंदी उठवली जाणार नाही. यामुळे भारतात PUBG मोबाइलची एन्ट्री कठीण झाली आहे.
IGN इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, PUBG मोबाइलबद्दल असे म्हटले आहे की, हा गेम परत येऊ शकत नाही. पबजी बॅटलग्राऊंड गेमच्या मोबाइल व्हर्जनवरील बंदी उठवण्याची सरकारची कोणतीही योजना नाही आहे. तसेच, डेव्हलपर्स आणि अधिकाऱ्यांमध्ये बदल झाले आहेत, परंतु हा गेम चीनमध्ये बेस्ड आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
तर, दुसऱ्या सुत्रांच्या माहितीनुसार, PUBG Corporation कडे अद्याप सरकारशी बोलण्यासाठी योग्य टीम नाही आहे. तसेच, PUBG Corporation आणि भारत सरकार यांच्यात मार्च किंवा एप्रिलपर्यंत बोलणी सुरू होतील. ज्यामुळे भारतीय ई-स्पोर्ट्स टीम इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये वर्षाच्या पुढील सहा महिन्यात भाग घेऊ शकेल, अशी शक्यता सुत्रांनी वर्तविली केली आहे.
दरम्यान, PUBG मोबाइलला एका नवीन व्हर्जनमध्ये भारतात पुन्हा आणला जाणार आहे. ज्याचे नाव PUBG Mobile India असेल, असे PUBG Corporation ने म्हटले होते. तर गेल्या वर्षी अनेक रिपोर्ट असे म्हटले गेले होते, भारतात PUBG पुन्हा आणण्यासंदर्भात सरकार PUBG Corporation सोबत चर्चा करण्यास तयार नाही.
याआधी PUBG Corporation ने PUBG Mobile India ला बंगळूरमध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणी केली होती. नंतर दोन वेगवेगळ्या आरटीआयच्या उत्तरात आयटी मंत्रालयाने PUBG गेम पुन्हा येण्यासंदर्भात नकार दिला.
आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, कोणतीही वेबसाइट, मोबाइल अॅप किंवा सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे PUBG मोबाइलला देखील परवानगी देण्यात आली नाही आहे.
PUBG मोबाइलबाबत सरकारची भूमिका फारशी स्पष्ट नाही. कंपनीकडूनही बराच गोंधळ उडाला आहे. अगदी क्राफ्टन अजूनही भारतात महत्त्वपूर्ण भाड्याने घेत आहे. गेल्या महिन्यात क्राफ्टनने PUBG मोबाइल इंडियासाठी कंट्री मॅनेजर म्हणून अनीश अरविंद यांना नियुक्त केले होते.
याआधी अनीश अरविंद हे चीनच्या Tencent पेरोलवर होते. केवळ अरविंद हेच नाहीत, तर Tencent इंडियामध्ये काम करणारे इतरही अनेक लोकांना कामावर ठेवले आहे. क्राफ्टनने या सर्वांना PUBG मोबाइल इंडियासाठी घेतले.
कंपनी PUBG मोबाइलसाठी भारताच्या टीमचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाधिक लोकांना कामावर घेत आहे. PUBG मोबाइल अद्याप भारतात परत येण्याची अपेक्षा आहे.
भारतात आता अँड्रॉइड फोनसाठी FAU-G गेम देखील लाँच करण्यात आला आहे. मात्र, हा भारतीय गेम PUBG मोबाइलसारखा नाही. हा एक अतिशय सोपा गेम आहे.
गेल्या वर्षी भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे. FAU-G गेम एका दिवसात 1 मिलियनहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आला आहे.