5000mAh ची मोठी बॅटरी, 6GB RAM असलेल्या Realme Narzo 50 चा पहिलाच सेल; असा मिळवा बंपर डिस्काउंट By सिद्धेश जाधव | Published: March 3, 2022 11:58 AM 2022-03-03T11:58:24+5:30 2022-03-03T12:11:17+5:30
Realme Narzo 50 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर झाला आहे. आज या फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासुन सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. किंमत Realme Narzo 50 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन स्पीड ब्लू आणि स्पीड ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.
डिस्प्ले Realme Narzo 50 4G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा पंच-होल डिजाइन असलेला FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश अडॅप्टिव्ह रेटला सपोर्ट करतो, जो बॅटरी वेगाने डिस्चार्ज करत नाही.
परफॉरमन्स हा फोन MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येतो. सोबत 6GB फिजिकल आणि 5GB पर्यंत व्हर्च्युअल RAM सपोर्ट मिळतो. तसेच 128GB पर्यंतची इंटरनल मेमोरी देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
बॅटरी पावर बॅकअपसाठी Realme Narzo 50 4G मध्ये 5,000mAh ची बॅटरी मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W डार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचरसह साइड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते.
कॅमेरा या स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा पोर्ट्रेट सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
ऑफर्स Realme Narzo 50 आज अर्थात 3 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून Amazon India आणि Realme.com वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा फोन HDFC बँकेच्या कार्डचा वापर करून विकत घेतल्यास 1,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच EMI ऑफर्सचा देखील समावेश आहे.