मुकेश अंबानींचा 'षटकार'; सहा मोठ्या घोषणा ज्या करू शकतात 'चमत्कार'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:23 PM2019-08-12T18:23:37+5:302019-08-12T19:11:54+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्या थेट सामान्यांना फायदा पोहोचवणार आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडविली होती.

आज तीन वर्षांनी पुन्हा त्यांनी जिओ गिगाफायबरची घोषणा करत देशातील 1600 शहरांना सुपरफास्ट इंटरनेट आणि बऱ्याच गोष्टींनी जोडण्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊयात त्यांनी केलेल्य़ा सहा घोषणा.

जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

सिनेमागृहांमध्ये रिलिज होणारा सिनेमा त्याच दिवशी घरबसल्या पाहता येणार आहे. ही सेवा 2020 पासून देण्यात येईल. यामुळे तुम्हाला टॉकीजमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.

अमेरिका, कॅनडासाठी 500 रुपयांचे अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन असतील. तसेच आयएसडी कॉलिंगचेही दर दहा पटींनी कमी केले आहेत.

फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. यावरून व्हिडिओ कॉलिंगही करता येणार आहे. यासाठी जिओ फॉरेव्हर प्लॅन घ्यावा लागणार आहे. यासाठी किती रक्कम आकारणार याबाबत काहीच सांगितलेले नाही.

स्टार्टअप कंपन्यांसाठी क्लाऊड सर्व्हिस मोफत असणार आहे. ही सेवा 1 जानेवारीपासून दिली जाईल. याशिवाय लघू, मध्यम व्यवसाय इंटरनेट आणि अॅप्लीकेशन जोडणीसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी यापुढे 1500 रुपये खर्च येणार आहे.

14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च रिलायन्स करणार आहे.