Reliance Jio: रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर; पैसे न देताच मिळणार डेटा, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 01:46 PM2021-07-03T13:46:21+5:302021-07-03T13:51:43+5:30

Recharge now, pay later Reliance Jio offer: मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सच्या या कंपनीने करोडो ग्राहकांसाठी Recharge now Pay Later ही सुविधा आज लाँच केली आहे.

Reliance Jio ने शनिवारी आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर जाहीर केली आहे. यानुसार Emergency Data Loan सुविधा दिली जाणार आहे. (Reliance Jio Emergency Data loan facility on My Jio app in 5 easy steps)

मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सच्या या कंपनीने करोडो ग्राहकांसाठी Recharge now Pay Later ही सुविधा आज लाँच केली आहे.

नव्या ऑफरनुसार जिओ युजर इन्स्टंट डेटा लोन घेऊ शकणार आहेत आणि नंतर पैसे चुकते करू शकणार आहोत. यामुळे अडचणीच्या वेळी, पैसे देण्याचे साधन नसल्यास आपत्कालीन इंटरनेट मिळणार आहे.

Recharge Now And Pay Later मध्ये ग्राहकांना एका निश्चित कालावधीपर्यंत पैसे भरता येणार आहेत. ही सेवा डेली डेटा संपल्यानंतर लगेचच रिचार्ज करण्यास सक्षम नाहीत त्यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

महत्वाचे म्हणजे जिओ प्रिपेड युजरसाठी १ जीबी पर्यंतचा डेटा पाचवेळा घेता येणार आहे. १ जीबी डेटाची किंमत ११ रुपये आहे.

माय जिओ My jio अॅपवर जावे. डाव्या बाजुला वर मेनूवर क्लिक करावे.

आता मोबाईल सव्हिसेस Mobile Servicesमध्ये दिसणाऱ्या Emergency Data Loan ला निवडावे.

Emergency Data Loan वर Proceed बटन दिसेल त्यावर क्लिक करावे.

यानंतर Get Emergency Data ऑप्शन सिलेक्ट करावा. तिथे Activate Now वर क्लिक करावे.

यानंतर तुम्हाला इमरजन्सी डेटा मिळण्यास सुरुवात होणार आहे. घरून काम करणाऱ्यांसाठी हे फायद्याचे आहे.