Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे By सिद्धेश जाधव | Published: December 29, 2021 05:12 PM 2021-12-29T17:12:41+5:30 2021-12-29T17:29:11+5:30
Reliance Jio नं आपल्या ग्राहकांसाठी एक वॉर्निंग लेटर लिहलं आहे, या लेटरयामध्ये ऑनलाइन फ्रॉड्सपासून बचाव करण्यासाठी 7 गोष्टींची काळजी घेण्यास सांगितलं आहे. चला जाणून घेऊया कोणत्या चुका नुकसानदायक ठरू शकतात. Reliance Jio नं ग्राहकांसाठी महत्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांच्या नावानं होणाऱ्या सायबर क्राईम्सची संख्या वाढली आहे. यात कॉल, मेसेजच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून लाखो रुपयांना गंडा घातला जातो.
सध्या e-KYC scam खूप चर्चेत आहेत. म्हणून जियोनं आपल्या युजर्ससाठी एक वॉर्निंग लेटर लिहलं आहे. या लेटरयामध्ये 7 चुका टाळण्याची सूचना दिली आहे. फक्त जियो नव्हे तर एयरटेल आणि वोडाफोन-आयडियानं देखील अशी वार्निंग दिली आहे.
e-KYC कॉल्स तात्काळ कट करा e-KYC व्हेरिफिकेशनसाठी अनेक जियो युजर्सना वारंवार कॉल्स आणि मेसेज येत आहेत. तुम्हाला असा कॉल किंवा मेसेज आल्यास त्याकडे लक्ष देऊ नका. मेसेजला रिप्लाय देऊ नका किंवा कॉल उचलल्यास तो तात्काळ कट करा.
थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करू नका कॉल किंवा मेसेज द्वारे e-KYC व्हेरिफिकेशन करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं जातं. असे केल्यास तुमची ऑनलाईन फसवणुक होऊ शकते. त्यामुळे जर तुमचा बँक बॅलन्स शाबूत ठेवायचा असेल तर थर्ड पार्टी अॅप्स पासून दूर राहा.
डॉक्यूमेंट्स शेयर करू नका Reliance Jio चा अधिकारी म्हणून खोटे कॉल्स केले जातात. अशा e-KYC व्हेरिफिकेशनसाठी आधार नंबर, ओटीपी किंवा बँक अकॉउंट नंबर देखील मागितला जाऊ शकतो. चुकूनही ही माहिती देऊ नका.
सीम कार्ड बंद होण्याची धमकी e-KYC व्हेरिफिकेशन करा नाही तर तुमचं सीम बंद केलं जाईल अशी भीती दाखवली जाऊ शकते. परंतु एकदा वैध कागदपत्र देऊन घेतलेलं सीम जर तुम्ही नियमित वापरत असाल तर ते कोणीही बंद करू शकत नाही, हे लक्षात असू द्या.
मेसेजला रिप्लाय करणं पडू शकतं महागात e-KYC व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या मेसेजला रिप्लाय दिल्यास फ्रॉड करणाऱ्यांचा संपूर्ण ग्रुप तुम्हाला वारंवार कॉल करून त्रास देऊ शकतो.
लिंकवर क्लिक करू नका अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. एका क्लिकमध्ये तुमची माहिती सायबर गुन्हेगारांकडे पोहचू शकते.
अधिकृत माहित My Jio App वर जियोच्या कनेक्शन संबंधित संपूर्ण माहिती MY Jio App वरून मिळू शकते. त्यामुळे थर्ड पार्टी अॅप्स किंवा लिंकवर जाऊन तुमची खाजगी माहिती सबमिट करू नका.