Reliance jio to scrap complementary data from top up vouchers as offnet calls are now free
JIO युझर्सना आता टॉप अप व्हाउचर्ससह अॅडिशनल डेटा मिळणार नाही!; 'असं' आहे कारण By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 1, 2021 07:49 PM2021-01-01T19:49:32+5:302021-01-01T19:58:41+5:30Join usJoin usNext Jioने जिओवरून दुसऱ्या फोनवर करण्यात येणारे लोकल कॉल्स पुन्हा एकदा फ्री करण्याची घोषणा केली आहे. मात्र, फ्री कॉलिंगचा अर्थ असा नाही, की आपण कुठलाही प्लॅन न घेता कॉलिंग करू शकाल. आता पूर्वी प्रमाणेच कुठल्याही क्रमांकावर प्लॅनसह लोकल कॉल्स फ्री असतील. मात्र, याच बरोबर कंपनीने आपल्या युझर्सना दिला जाणारा कॉम्प्लिमेंटरी डेटा बंद केला आहे. IUC (इंटरकनेक्ट यूसेज चार्ज)मुळे जिओने आपल्या ग्राहकांकडून ऑफनेट कॉलिंगसाठी पैसे घेणे सुरू केले होते. मात्र, आता TRAIने IUC बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिओनेदेखील लोकल ऑफनेट कॉलिंग फ्री केली आहे. ऑफनेट कॉलिंगसाठी जोवर पैसे लागत होते, तोवर रिलायन्स जिओकडून युझर्सना टॉप अप व्हाउचर्ससह 1GB, 2GB, 5GB, 10GB, 50GB आणि 100GB डेटा दिला जात होता. हे टॉक टाईम व्हाउचर्स 10 रुपयांपासून सुरू होतात. 10 रुपयांपासून 1000 रुपयांच्या टॉप अप व्हाउचर्ससह अॅडिशनल डेटा दिला जात होता. तो आता मिळणार नाही. रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर सांगण्यात आले होते, की जिओवरून दुसऱ्या क्रमांकावर कॉल करण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रत्येक 10 रुपयांवर युझर्सना अॅडिशनल 1GB डेटा कॉम्प्लिमेंट्री दिला जात होता. ...मात्र, आता जिओकडून लोकल ऑफ नेट कॉलिंग फ्री करण्यात आली आहे, यामुळे आता ही डेटा ऑफरदेखील काम करणार नाही. मात्र, हे टॉप अप व्हाउचर्स अजूनही उपलब्ध होतील, मात्र, माध्यमांतील माहितीनुसार, यावर अॅडिशनल डेटा दिला जाणार नाही. रिलायन्स जिओने ऑक्टोबर 2020पासून युझर्सकडून दुसऱ्या नंबरवर लोकल कॉल्स करण्यासाठी पैसे घ्यायला सुरुवात केली होती. रिलायन्स जिओ प्रत्येक मिनिटासाठी 6 पैसे घेतले जात होते. यासाठी कंपनीने काही स्पेशल रिचार्जदेखील आणले होते. मीत्र, आता कदाचित तेही बंद केले जाऊ शकतात.टॅग्स :रिलायन्स जिओजिओरिलायन्समुकेश अंबानीReliance JioJioRelianceMukesh Ambani