AC विकत घेणं शक्य नाही? मग या वेबसाईटवरून घ्या रेंटवर एयर कंडिशन, बजेटमध्ये मिळवा गारवा
By सिद्धेश जाधव | Updated: March 16, 2022 15:54 IST2022-03-16T15:30:00+5:302022-03-16T15:54:13+5:30
जर एसी विकत घेणं शक्य नसेल तर तुम्ही काही ऑनलाईन वेबसाईट्सवरून एयर कंडिशन रेंटवर देखील घेऊ शकता. जे लोक भाड्यानं राहतात त्यांच्यासाठी हा पर्याय खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतो.

जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असला तर एसी विकत घेणं शिफ्टिंगच्या दृष्टीनं देखील महागडं ठरू शकतं. जेव्हा शिफ्टिंग केलं जातं तेव्हा पुन्हा इंस्टॉलेशन फी देखील द्यावी लागते.
भारतात सध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही एसी काही कालावधीसाठी रेंटवर घेऊ शकता. उन्हाळ्यात जेव्हा गारव्याची जास्त गरज असते तेव्हा तुम्ही हा पर्याय वापरू शकता.
एसी विकत घेण्यासाठी एकाच वेळी जास्त रक्कम देण्याऐवजी तुम्ही भाड्यानं एसी घेऊ शकता. ही सर्व्हिस देणाऱ्या वेबसाईट फक्त प्रोडक्ट देत नाहीत तर डिलिव्हरी आणि मेंटेनन्सची देखील काळजी घेतात. पुढे आम्ही अशाच काही वेबसाईट्सची माहिती दिली आहे.
महत्वाची सूचना: या वेबसाइट्सचे नियम वेगवेगळे असू शकतात. सेवा घेण्यापूर्वी एकदा त्यांच्या अटी आणि शर्थी वाचून घ्याव्यात. तसेच काही शंका असल्यास कस्टमर सपोर्टची मदत घेऊ शकता.
RENTOMOJO
या प्लॅटफॉर्मची वेबसाईट तर आहेत परंतु अँड्रॉइड आणि आयओएस अॅप देखील आहे. ही वेबसाईट दिल्ली, मुंबई, नोयडा, गुरुग्राम, चेन्नई आणि बेंगळुरू इत्यादी शहरांमध्ये सेवा देते.
Rentomojo तुम्ही किती काळ एसी रेंट करणार आहात त्यानुसार मोफत रिलोकेशन आणि अपग्रेड सेवा देते. एक टनाचा स्प्लिट एसी भाड्यानं घेण्यासाठी 1,949 रुपये डिपॉजिट द्यावा लागतं जे रिफंडेबल आहे, या एसीचं दरमहा 1,399 रुपये भाडं द्यावं लागेल. ही बेस मॉडेल्सची किंमत आहे. तसेच तुम्हाला 1,500 रुपयांचे इंस्टॉलेशन चार्जेस द्यावे लागतील.
CITYFURNISH
एसी रेंटवर देण्याचं काम CityFurnish देखील करते. ही सेवा दिल्ली, हैद्राबाद, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये उपलब्ध आहे. 1 टन विंडो एसीचं एका महिन्याचं भाडं 1,069 रुपयांपासून सुरु होतं. तर स्प्लिट एसी 1,249 रुपये दरमहा देऊन रेंटवर घेता येईल.
FAIRENT
Fairent वेबसाईट एसीचा सर्व खर्च भाड्यात सामावून घेते. 1.5 टनाचा विंडो एसी 1,375 रुपयांमध्ये वापरता येईल. यात इंस्टॉलेशन कॉस्ट आणि स्टॅबिलायजरचा समावेश आहे.
RENTLOCO
Rentloco वेबसाईट देखील ऑनलाईन एसी रेंट करण्याची सेवा देते. इथे तुम्ही विंडो एसी आणि स्प्लिट एसी अनुक्रमे 1,299 रुपये आणि 1,599 रुपये देऊन भाड्यावर घेता येईल. इथे कमीत कमी तीन महिने एसी रेंटवर घ्यावा लागतो.