Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:07 AM2021-03-20T11:07:18+5:302021-03-20T11:15:12+5:30

Sachin Vaze Case: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Antilia Case) यांच्या अंटीलियाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीसांचे अधिकारी सचिन वाझे यांचे आयुष्यच एक रहस्यमची ठरण्याची शक्यता आहे. 2003 मधील निलंबनानंतर वाझेंनी अनुभव पणाला लावला होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटीलियाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीसांचे अधिकारी सचिन वाझे यांचे आयुष्यच एक रहस्यमची ठरण्याची शक्यता आहे. या एन्काऊंटर स्पेशालिस्टने स्वत:चाच सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म चालविण्यापासून ते व्हॉट्सअॅपसारखे स्वदेशी मॅसेजिंग अॅप बनविण्यापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये हात मारून पाहिला आहे.

सचिन वाझे यांनी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांच्या नावावर सहा ट्रेडमार्क नोंद असून एकदा तर कॉपीराईट उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी बॉलीवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझावर खटलाही दाखल केलेला आहे.

सचिन वाझे यांना गेल्या वर्षी जूनमध्ये पुन्हा पोलीस खात्यात घेण्यात आले. त्याआधी वाझेना 2003 मध्ये ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून ते 2020 पर्यंत वाझेंनी अनेक क्षेत्रात हात आजमावला आहे.

वाझेंनी औद्योगिकी, एन्क्रिप्टेड साहित्य, सोशल मिडीया, सायबर स्पेस आणि दूरसंचारच्या दुनियेत एन्ट्री केली होती.

वाझे यांनी सुरुवातीच्या काळात तंत्रज्ञानावर संबंधीत सायबर क्राईम, बँक कार्ड आणि फसवणूक आदी गुन्ह्यांवर काम केले होते. त्याचा फायदा त्यांनी निलंबन झाल्यानंतर घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंटरनेट प्लॅटफॉर्मवर विविध उत्पादने बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी या अनुभवाचा वापर केला.

यामध्ये त्यांचे सर्वात प्रभावशाली असलेले त्यांचे मॅसेंजिंग अॅप "डायरेक्ट बात" होते. हे अॅप उद्योजक, सरकारी एजन्सी आणि हायप्रोफाईल लोकांसाठी खास बनविण्यात आले होते. वाजे यांनी ही पेड सर्व्हिस असून ते दुनियेतील सर्वात सुरक्षित अॅप असल्याचा दावा केला होता.

हे अॅप 2018 मध्ये लाँच केले होते. तंत्रज्ञान विशेषज्ञ संयोग शेलारच्या मदतीने त्यांनी हे अॅप बनविले होते. यामध्ये मेसेज, व्हि़डीओ, कॉलिंग आणि फाईल पाठविण्याची सोय होती.

सचिन वाझे यांनी सहा ट्रेडमार्क रजिस्टर केले होते. यामध्ये "LAPCOP", "KNOW YOUR LAW", "A Fascinating Side of Life" आणि "LAI BHAARI" याचा समावेश होता. लय भारीवरून रितेशला नोटीस पाठविण्यात आली होती. 2014 मध्ये रितेशचा एक सिनेमा याच नावे आला होता.

फेसबुकने 2006 मध्ये भारतात एन्ट्री केली होती. वाझेंनी लगेचच हे देखील करण्याचे ठरविले. त्यांनी 2010 मध्ये मराठी भाषिकांसाठी स्थानिक फेसबुकसारखी साईट लाँच केली. "मराठी फेसबुक" असाच याचा प्रचार करण्यात आला होता.

वाझे य़ांनी भारतीय लोकांना माहिती मिळविण्यासाठी एक सर्च इंजिनदेखील तयार केले होते. 2012 मध्ये याचे लाँचिंग झाले होते. Indianpeopledirectory.com असे या सर्च इंजिनचे नाव होते. हे इंजिन नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आदी पुरवत होते.

26/11 च्या हल्ल्यावर वाझेंनी दोन पुस्तके लिहिली आहेत. 2012 मध्ये जिंकून हरलेली लढाई आणि 2019 मध्ये 'द स्काउट' नावाची ही पुस्तके प्रकाशित केली होती. ही माहिती आजतकने दिली आहे.