Samsung launched a foldable smartphone ... Looking at the price saw the eyes
सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन आला... किंमत पाहून डोळे विस्फारतील By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 01:42 PM2019-02-21T13:42:58+5:302019-02-21T13:52:39+5:30Join usJoin usNext दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने बुधवारी मध्यरात्री जगातील पहिला फोल्डेबल 5 जी स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या फोनची चर्चा होत होती. याशिवाय कंपनीने एस 10 सह तीन फोन लाँच केले आहेत. फोल्डेबल स्मार्टफोन दुमडल्यावर हा फोन 4.6 इंचाचा बनतो, तर खोलल्यानंतर 7.4 इंचाच्या टॅबलेटमध्ये रुपांतर होते. या फोनची किंमत 1.41 लाख रुपये एवढी आहे. या फोनमध्ये दोन डिसप्ले देण्यात आले आहेत. या फोनची विक्री एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आहे. मात्र, कोणत्या देशांत उपलब्द होणार याबाबत कंपनीने स्पष्ट केलेले नाही. महत्वाचे म्हणजे ज्या देशांमध्ये 4 जी आहे तेथे 4 जी फोन उपलब्ध केले जाणार आहेत. यामुळे भारतातही हा फोन मिळण्याची शक्यता आहे. स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर देण्यात आला असून 12/512 जीबी स्टोरेज आणि दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत. एकूण 4380 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. काही फोनमध्ये इनडिस्प्ले तर काही फोनमध्ये साईड बटनावर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. या लाँचिंग इव्हेंटमध्ये सॅमसंगने Galaxy S10, S10+ आणि S10e हे फोनही लाँच केले आहेत. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. यामध्ये LED फ्लॅशसोबत हार्ट रेट सेन्सरही असणार आहे. यामध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. Galaxy S10 मध्ये 6 आणि 8 जीबी रॅमसर 128/512 जीबी स्टोरेज असणार आहे. तर S10+ मध्ये 12 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज असणार आहे. जोडला जाणारा स्पीकर लाँच केला आहे. ब्ल्यूटूथ हेडसेटटॅग्स :सॅमसंगमोबाइलsamsungMobile