सॅमसंगने मायक्रो एलईडी डिस्प्ले आणला; केवळ अब्जाधीशच घेऊ शकतात एवढी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 07:56 PM2019-12-05T19:56:19+5:302019-12-05T19:59:33+5:30

सॅमसंगने आज लॉर्ज-फॉर्मेट माइक्रो LED डिस्प्ले 'द वॉल' (The Wall) लॉन्च केला आहे. 0.8mm पिक्सल पिच तंत्रज्ञानाने युक्त असलेला हा डिस्प्ले जगातील पहिला मॉड्यूलर माइक्रो LED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 'द वॉल' अनेक साईज आणि रेशोमध्ये आलेला आहे.

146 इंच (370.8 सेंटीमीटर)चा डिस्प्ले 4K मध्येही उपलब्ध आहे. तर 219 इंचाचा 6K, तर 292 इंचाचा (741.7 सेंटीमीटर)चा मायक्रो एलईडी डिस्प्ले 8K डेफिनेशनमध्ये आला आहे.

मात्र, या डिस्प्लेची किंमत थक्क करणारी आहे. हा टीव्ही केवळ अब्जाधीशच घेऊ शकणार आहेत.

या डिस्प्लेची किंमत 3.5 कोटी ते 12 कोटी रुपये आहे. हा टीव्ही 5 डिसेंबरपासून भारतात उपलब्ध करण्यात आले आहेत. माइक्रो LED डिस्प्ले गुडगांवच्या सॅमसंगच्या एक्झिक्यूटिव ब्रीफिंग सेंटरद्वारे उपलब्ध होणार आहे.

हा डिस्प्ले साध्या एलईडी डिस्प्लेच्या तुलनेत खूप क्लिअर व्हिजन देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच वीजही वाचविणारा आहे.

हा टीव्ही नसून तो डिजिटल कॅनव्हॉससारखा भिंतीवर लटकवता येणार आहे. AI अप-स्केलिंग, क्वॉन्टम HDR टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

तसेच हा डिस्प्ले कधीही बंद न करण्याच्या दृष्टीने बनविण्यात आला आहे. याला 1 लाखांचे आयुष्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे.