अनंत अमुची ध्येयासक्ती! अपघातामुळे स्वप्न मोडलेली 'ती' टिकटॉकवरुन करते लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:31 IST2020-01-07T14:19:34+5:302020-01-07T14:31:05+5:30

टिकटॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मोठ्या प्रमाणात युजर्स टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असतात. टिकटॉकने अनेकांना प्रकाशझोतात आणले आहे. तर काहींना व्हिडीओवरच्या लोकप्रियतेने लाखो रुपये कमवण्याची संधी मिळाली आहे.

टिकटॉकवरील प्रेरणादायी वक्त्या आणि इंग्रजीच्या शिक्षिका संगीता जैन यांचे व्हिडीओ सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

संगीता यांना अभिनयाची आवड असल्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे होते. मात्र एका अपघातानंतर त्यांचं आयुष्यचं बदललं. पण संगीता यांनी हार मानली नाही.

संगीता यांचा प्रवास सर्वांसाठीचं प्रेरणादायी आहे. अपघातानंतर त्या खचल्या नाहीत तर त्यांनी परिस्थितीवर मात करत स्वत: ची नवी ओळख निर्माण केली.

संगीता यांचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स असून त्या प्रेरणादायी आणि इंग्रजी शिकवणारे अनेक व्हिडीओ त्या तयार करत असतात.

गीता या नावाने त्यांचं टिकटॉकवर अकाऊंट असून त्यांनी सुरुवातीला प्रेरणादायी आणि विनोदी व्हिडीओ तयार करायला सुरुवात केली.

संगीता यांच्या व्हिडीओंना तूफान लाईक्स मिळतात. तसेच त्या व्हिडीओच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत.