लय भारी! WhatsApp वर फक्त 'Hi' पाठवा अन् नोकरी मिळवा; लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्यांसाठी सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 11:42 AM2021-02-11T11:42:56+5:302021-02-11T11:58:42+5:30

WhatsApp And Job : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला असून अनेकांचे उद्योग-धंदे बंद पडले आहेत. याच दरम्यान नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

कोरोनाच्या काळात कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं. कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार होती. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला.

हातवरचं पोट असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला असून अनेकांचे उद्योग धंदे बंद पडले आहेत. याच दरम्यान नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून त्याचा वापर हो मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप hii पाठवा आणि नोकरी मिळवा अशी एक योजना आली आहे.

लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सरकारने ही योजना आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर हाय पाठवल्यानंतर मजुरांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्या मिळणार आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology ) बुधवारी लाँच केलेल्या केलेल्या कृत्रिम-बुद्धिमत्ता चॅटबॉटमुळे हे सहज शक्य होणार असल्याची माहिती मिळत आहे.

द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने (TIFAC) श्रमिक शक्ती मंच (Shramik Shakti Manch (SAKSHAM)) नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे. जे मजूरांना त्यांच्या मूळ ठिकाणी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी व्हॉट्सअ‍ॅपवर जोडले जाणार आहे.

द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच श्रमिकची निर्मिती झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे काम नसल्याने लाखो परप्रांतीय कामगार, मजूरांना आपापल्या घरी परतावं लागलं. स्थलांतरित मजुरांना शेकडो किलोमीटर अंतरावर पायपीट करत त्यांच्या मुलांसह, कुटुंबासह आपल्या गावी परतावं लागलं.

कोरोनाच्या संकटात अनेक मजूरांनी आपलं उत्पन्नाचं साधन गमावलं. या पोर्टलवर भारतातील MSME चा संपूर्ण नकाशा आहे. नोकरीची उपलब्धता आणि त्यांना आवश्यक असलेलं कौशल्य वापरून हे पोर्टल त्यांच्या प्रांतातील संभाव्य रोजगाराच्या संधी असलेल्या मजुरांशी जोडले जाईल.

7208635370 या नंबर Hi पाठवून मजूर सहज संपर्क साधू शकतात. एखाद्या मजूराने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटवर मेसेज पाठवल्यानंतर पोर्टल त्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाविषयी माहिती घेईल.

मजुराने दिलेल्या माहितीच्या आधारे AI सिस्टम जवळच्या उपलब्ध नोकरीसोबत त्या लोकांना कनेक्ट करणार आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. द प्रिंटने याबाबतचे वृत्त दिले आहे.