Send a message to WhatsApp on mobile before saving the number
मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करायच्या आधी पाठवा WhatsApp वर मेसेज By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:33 PM2019-01-14T15:33:18+5:302019-01-14T15:51:12+5:30Join usJoin usNext सध्याच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात व्हॉट्सअॅप हे मेसेज, फोटो पाठविणारे महत्वाचे माध्यम आहे. स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅपवरुन मेसेज, व्हिडीओ कॉल, फोटो पाठविणे हे सर्वांनाच माहीत आहे. एखादा फोन नंबर सेव्ह नसेल, तर तो नंबर सेव्हकरुन त्यानंतर त्या नंबरवर मेसेज केला जातो. मात्र, सेव्ह नसलेल्या नंबरवर व्हॉस्ट्अॅपवरुन अशा पद्धतीनेही मेसेज पाठवू शकता.... सर्वांत आधी तुमचा फोन या डेस्कटॉपच्या ब्राउजरमध्ये ओपन करा. याठिकाणी ‘https://api.whatsapp.com/send?phone=XXXXXXXXXXX’ ही लिंक द्या.(लक्षात असू द्या की X च्या जागी तुम्हाला कंट्री कोड सोबत मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.) उदाहरणार्थ, जर तुम्हाला 1234567890 वर मेसेज पाठवायचा असेल, तर ब्राउजरमध्ये https://api.whatsapp.com/send?phone=911234567890 अशी यूआरएल द्यावी लागेल. यामध्ये मोबाईल नंबरच्याआधी भारताचा कंट्रीकोड 91 दिला आहे.) ही लिंक ब्राउजरमध्ये दिल्यानंतर Enter बटन प्रेस करा. त्यानंतर यामध्ये चॅट बॉक्स ओपन होईल. त्यात असलेल्या Message बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही नंबर सेव्ह करायच्याआधी संबंधित नंबरवर मेसेज करु शकता. इतर चॅटप्रमाणे हे चॅट सुद्धा सुरक्षित ऐंड-टू-ऐंड एन्क्रिप्शन) असेल. टॅग्स :तंत्रज्ञानव्हॉटसअॅपtechnologyWhatsApp