गुगलवर लहान मुलांनी न्यूड फोटो किंवा व्हिडिओ पाहू नयेत म्हणून आजच मोबाईलमध्ये करा 'ही' सेटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 07:19 PM2024-08-21T19:19:11+5:302024-08-21T19:23:39+5:30

एआयचा वापर करून फोटो आणि व्हिडिओंमध्ये छेडछाड करत दिशाभूल केली जाते. यामध्ये एडल्ट कंटेन्टचाही समावेश आहे.

जगातील सर्वांत मोठा सर्च इंजिन प्लॅटफॉर्म म्हणून गुगलकडे पाहिलं जातं. फोन, टीव्ही, लॅपटॉप आणि वॉचसह अनेक ठिकाणी गुगल उपलब्ध आहे.

गुगल सर्चवरून यूजर्सना आवश्यक असलेली माहिती मिळते. मात्र काही वेळा या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोगही केला जातो. खासकरून लहान मुले या प्लॅटफॉर्मवर चुकीच्या गोष्टींकडे आकृष्ट होतात.

या पार्श्वभूमीवर मुलांनी गुगलवर चुकीचे फोटो किंवा व्हिडिओ सर्च करून पाहू नयेत, यासाठी पालकांनी त्यांच्या मोबाईलवरील गुगल सर्च सेटिंगमध्ये बदल करणं आवश्यक आहे.

अलीकडच्या काळात गुगल सर्चमध्ये डीपफेक कंटेन्टमध्ये मोठी वाढ झाली आहे. एआयचा वापर करून फोटो आणि व्हिडिओंमध्ये छेडछाड करत दिशाभूल केली जाते. यामध्ये एडल्ट कंटेन्टचाही समावेश आहे.

लहान मुलांनी गुगलवर न्यूड फोटो किंवा व्हिडिओ पाहू नयेत, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर गुगल अकाऊंट लॉगइन करावं लागेल.

अकाऊंट लॉगइन केल्यानंतर गुगल सपोर्ट पेजवर जावं आणि त्यानंतर कंटेन्ट रिमुव्हल पेजवर जावं लागेल.

त्यानंतर तुम्हाला स्टार्ट रिमुव्हल रिक्वेस्ट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला चार पर्याय उपलब्ध होतील. या पर्यांयातून तुम्हाला अपेक्षित असलेला पर्याय निवडावा लागेल.