slow wi fi at home tricks you must know to boost internet speeds
तुमचं वाय-फाय स्लो आहे? 'या' खास ट्रिक्सने वाढवा इंटरनेट स्पीड By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:44 PM2019-03-26T14:44:28+5:302019-03-26T14:51:27+5:30Join usJoin usNext वाय-फाय ही आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र अनेकदा इंटरनेटसाठी पैसे मोजूनही आपल्याला हवा तसा इंटरनेट स्पीड नाही. काही वेळा सर्विस प्रोव्हायडरची यामध्ये चूक असते. तसेच काही वेळा हार्डवेअरच्या चुकाही असतात. इंटरनेटचा स्पीड वाढवण्याच्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया. वाय-फाय राउटरला अपडेट करा आपलं वाय-फाय राउटरला नेहमी अपडेट करत राहा. लेटेस्ट फर्मवेअरमुळे इंटरनेट स्पीड आधीपेक्षा चांगला होऊ शकतो.चांगल्या फ्रीक्वेंन्सीची निवड करा ड्युअल बँड वाय-फाय राउटरसाठी 5GHz ची निवड करा. आपला इंटरनेट स्पीड चांगला होण्यासाठी याची मदत होते. राउटर भिंतीपासून दूर ठेवा वाय-फाय राउटर भिंतीपासून दूर ठेवा. राउटर कसे ठेवता यावर अनेकदा त्याचा इंटरनेट स्पीड अवलंबून असतो.लेटेस्ट राउटरचा वापर करा इंटरनेट प्लॅनचा चांगला अनुभव घेण्यासाठी नवीन राउटरचा वापर करा.लो-कॉस्ट रिपीटर्सचा वापर करा मोठ्या परिसरात वाय-फाय कव्हरेजला बूस्ट करण्यासाठी लो-कॉस्ट रिपीटर्सचा वापर करा.टॅग्स :इंटरनेटवायफायमोबाइलInternetWiFiMobile