आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:17 PM2022-02-15T19:17:27+5:302022-02-15T19:34:07+5:30

1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. यात गॅजेट्ससह गृहपयोगी वस्तूंचा देखील समावेश आहे. Budget 2022 मध्ये घेतलेले निर्णय 1 एप्रिलपासून लागू होतील त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठे बदल होऊ शकतात.

1 फेब्रुवारीला अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी Budget 2022 सादर केलं होतं. या बजेटमध्ये देशातील इलेट्रॉनिक कंपोनंट्सच्या निरीमीतला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहे. ज्यांचा परिणाम सर्वसामान्यांच्या घरच्या बजेटवर होणार आहे.

सरकारचे हे निर्णय 1 एप्रिल 2022 पासून देशात लागू केले जातील. त्यामुळे अनेक इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमती वाढू शकतात आणि तर काही वस्तूंच्या किंमतीत दिलासा देखील मिळू शकतो.

सरकारनं मोबाईल फोन संबंधित अनेक कंपोनंट्सवरील ड्यूटी कमी केली आहे. ज्यात चार्जर, ट्रान्सफॉर्मर, कॅमेरा लेन्स मॉड्यूल आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे निर्मितीचा खर्च कमी होऊन किंमती देखील कमी होतील.

यंदाच्या बजेटमध्ये स्मार्टवॉच संबंधित काही पार्ट्सवरील कस्टम ड्यूटी देखील कमी केली आहे. याचा थेट फायदा यांची फॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांना मिळेल. त्यामुळे स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड स्वस्त होऊ शकतात.

जर तुम्ही वायरलेस इयरबड्स घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला घाई करावी लागेल. बजेटमध्ये वायरलेस इयरबड्सच्या काही पार्ट्सवरील आयात कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नेकबँड, हेडफोन, वायरलेस इयरबड्ससाठी जास्त पैसे मोजावे लागतील. हेडफोन्सच्या आयातीवरील कर देखील वाढवण्यात आला आहे.

1 एप्रिल 2022 पासून रेफ्रिजरेटरमधील कंप्रेसरमध्ये वापरण्यात आलेल्या पार्ट्सवरील आयात कर वाढण्यात आला आहे. त्यामुळे देशात फ्रिजच्या किंमती पुढील आर्थिक वर्षात वाढू शकतात.