Smartphone Storage Problem: तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज संपलंय? या सोप्या पद्धती फॉलो करुन मिळवा जास्त स्पेस By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:09 PM 2022-02-22T15:09:08+5:30 2022-02-22T15:12:24+5:30
Smartphone Storage Problem: सध्या जास्त रॅम आणि स्टोरेज असलेल्या फोन्सची मागणी जास्त आहे. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही स्टोरेज वाढवू शकता. मागील काही वर्षात स्मार्टफोन मार्केट झपाट्याने वाढत आहे. दररोज नवनवीन फोन्स येत आहेत. यातच जास्त रॅम आणि स्टोरेज असलेल्या मोबाईलची सर्वाधिक मागणी असते.
फोनची स्टोरेज भरत आल्यावर फोन स्लो होतो किंवा हँग मारतो. अशात फोन स्टोरेज कमी केल्यास फोनची गती वाढते आणि फोन योग्यरितीने चालू लागतो.
आज आम्ही तुम्हाला फोन स्टोरेज वाढवण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत. हा सोप्या पद्धती अवलंबून तुम्ही फोनची स्टोरेज वाढवू शकता.
क्लिनींग अॅप्स- गूगलच्या प्ले स्टोअरमध्ये अनेक असे अॅप्स आहेत, जे तुमच्या फोनचे स्टोरेज वाढवण्यास मदत करतात. हे अॅप्स तुमच्या फोनची मेमरी मोकळी करण्यात मदत करतील.
हे अॅप्स फोनमध्ये असलेल्या जंक फाइल्स, डुप्लिकेट फाइल्स आणि अनेक मोठ्या फाइल्स डिलीट करतात. यामुळे फोनचे स्टोरेज वाढते. फोन क्लीनर, व्हायरस क्लीनर, CCleaner यांसारखे अॅप चांगला पर्याय असू शकतात.
क्लाउड स्टोरेज- क्लिनर अॅपशिवाय तुम्ही तुमच्या फाईल्स ऑनलाइन सेव्ह करू शकता. यासाठी गुगलचा क्लाउड स्टोरेज आहेत, किंवा आता अनेक मोबाईल कंपन्याच फोनसह त्यांचा क्लाउड स्टोरेज देत आहेत.
तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या फोनवरील फोटो आणि व्हिडिओ किंवा इतर फाईल्स जास्त जागा व्यापत आहेत, तर तुम्ही तुमचा डेटा क्लाउडवर सेव्ह करू शकता. याशिवाय, ज्या फोटो आणि व्हिडिओची गरज नाही, असे डिलीट करा.
टेंपररी फाइल्स- आपल्या फोनमध्ये अशा अनेक फाईल्स आहेत ज्या तात्पुरत्या आहेत. त्या डिलीट करुन तुमच्या फोनची मेमरी वाढते. याशिवाय, फोनमधील कॅशे डिलीट करुनही फोनची जागा वाढते.