पेटीपॅक स्मार्टफोन, गॅझेट्स घेतल्या घेतल्या कोणती काळजी घ्यावी? जरूर पहा नाहीतर पस्तावाल... By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 04:10 PM 2021-02-05T16:10:24+5:30 2021-02-05T16:20:19+5:30
Security tips after buying New Gadgets : नवीन स्मार्टफोन घेतला की तो आधी चालू करून बघायची घाई झालेली असते. परंतू अती घाई संकटात नेई, सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे. नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी खालील काळजी नक्की घ्या... नवीन स्मार्टफोन घेतला की तो आधी चालू करून बघायची घाई झालेली असते. लॅपटॉप, स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही किंवा इतर कोणतंही गॅजेट... अशीच घाई होते. परंतू अती घाई संकटात नेई, सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे. इंटरनेटने जोडलेले नवे उपकरण तुमच्याच घरातील नेटवर्कमधून अशा काही गोष्टी हॅकरपर्यंत पोहोचवेल की नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी खालील काळजी नक्की घ्या...
तुमच्या घरातील वाय-फाय नेटवर्क सुरक्षित करा. तुमचे नवे उपकरण घरातील नेटवर्कवर जोडले जाण्यापूर्वी तुमच्या घरातील वाय-फाय राऊटरला बळकट एन्क्रिप्शनने सुरक्षित केले गेले असल्याची खातरजमा करा. असुरक्षित सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा. त्याचा वापर करायचाच असेल तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क किंवा व्हीपीएनची अतिरिक्त सुरक्षा वापरली जाईल, याची काळजी घ्या.
टच आयडी किंवा फेसआयडी ठेवा या सुविधेत वन-टच किंवा फेस-इनेबल्ड अॅक्सेस असतो, शिवाय बायोमेट्रिक सिक्युरिटीही असल्याने तुम्हाला दमदार संरक्षण मिळते.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) किंवा मल्टि-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. पारंपरिक पद्धतीचे पासवर्ड आता उत्तम संरक्षण पुरवत नाहीत. तुम्ही अॅपल डिव्हाईस वापरत असाल ज्यात iOS 9 किंवा OS X El Capitan चा वापर होतो तर तुम्हाला टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरता येईल. 2FA मुळे तुमच्या आयडेंटिटी-व्हेरिफिकेशनला तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फेशिअल बायोमेट्रिक्सच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसह सुरक्षेचे आणखी एक आवरण लाभते.
पासकोड स्ट्राँग ठेवा अनेक इंटरनेट कनेक्टेड उपकरणांमध्ये डिफॉल्ट पासवर्ड सेट अप असतो. पण यातील अनेक पासवर्ड कोणीही ऑनलाइन मिळवू शकतो. त्यामुळे तुमच्या नव्या डिव्हाईसवर तुम्ही वापरणार आहात त्या सर्व अॅप्लिकेशन्स आणि अकाऊंट्ससाठी नवा, स्ट्राँग लॉक स्क्रीन पासकोड तसेच स्ट्राँग, अनोखा पासकोड वापरा.
पासवर्ड मॅनेजर वापरण्याचा विचार करा. पासवर्ड मॅनेजरमुळे तुम्हाला पासवर्ड सुयोग्य स्थितीत आणि सुरक्षित ठेवता येतात. यासाठी पासवर्ड एन्क्रिप्टेड व्हॉल्टमध्ये साठवता येतात. या व्हॉल्टमध्ये एक दमदार स्ट्राँग मास्टर पासवर्ड असतो जे तुमच्या सर्व सर्व अकाऊंट्सना सहज अॅक्सेस उपलब्ध करून देतो आणि त्याचवेळी तुमच्या कॉम्प्युटरचे खासगीपण आणि सुरक्षितता राखण्यात साह्य करतो.
तुमच्या सेटिंग्सची पूर्ण तपासणी करा. तुमच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटी सेटिंग्जवर नीट लक्ष देणे, ते तपासणे ही एक चांगली कल्पना आहे. स्मार्ट उपकरणांमध्ये बहुतांश वेळा डिफॉल्ट सेटिंग्ज असतात ज्या तुमच्याऐवजी उत्पादकाच्या फायद्यासाठी केलेल्या असतात. उत्तम सुरक्षितता न देणाऱ्या अशा कोणत्याही प्रकारच्या डिफॉल्ट सेंटिंग्ज बदलणं विसरू नका.
अँटीव्हायरस सॉफ्टवेअर प्रतिष्ठित/विश्वासार्ह अँटिव्हायरस आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, त्यांना नियमितपणे अपडेट करा. ख्याती, विश्वासार्हता असलेले डिव्हाइस सिक्युरिटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. ऑटोमॅटिक अपडेटची सेटिंग साह्यकारी ठरू शकते, त्यामुळे ते विसरू नका. यामुळे, तुम्ही बहुतांश अप-टू-डेट सिक्युरिटी उपायांनी सुरक्षित असल्याची खात्री होते. हॅकर्स आणि मालवेअरसारख्या धोक्यांपासून तुम्ही यामुळे वाचू शकता.
सुरक्षिततेतील उणीवा दूर न केल्यास मालवेअरसारखे धोके कायम राहतात आणि त्यामुळे हॅकर्सना तुमच्या कॉम्प्युरटवर नियंत्रण मिळवता येते आणि तुमची पर्सनली आयडेंटिफायेबल इन्फॉर्मेशन (पीआयआय) वापरता येते. यातून सायबर गुन्हेगार ही पीआयआय वापरून तुम्ही ओळख चोरू शकतात किंवा आर्थिक गुन्हे करू शकतात. ते ही माहिती डार्क वेबवर इतरांच्या वापरासाठी विकूही शकतात.
मल्टि-लेअर फायरवॉल सुरक्षितता वापरा. फायरवॉल वापरल्याने तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा लाभते. यात नकोशे इनबाऊंड नेटवर्क कनेक्शन ब्लॉक केले जातात आणि मालवेअरला रोखण्यासाठी तुमच्या नेवटर्कवरील अॅप अॅक्सेसवर नियंत्रण ठेवले जाते.
अॅप इन्स्टॉल करताना... अॅप इन्स्टॉल करताना आणि त्यांना हव्या असलेल्या परवानग्या देताना काळजी घ्या. आवश्यकता नसल्यास त्यांना परवानगी देणे टाळा. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर ताण आणणारे कोणत्याही प्रकारचे अॅप न वापरणं फार महत्त्वाचं आहे.
उदा. स्मार्ट-वॉच अॅप्स तुमच्या अकाऊंटची माहिती आणि भौगोलिक माहिती वापरतील. तुम्हाला या माहितीवर निर्बंध घालावे लागतील. तुमच्या स्मार्टवॉचसारख्या उपकरणांना हॅक करू पाहणारे सायबरगुन्हेगार त्यात स्पायवेअर टाकू शकतात आणि त्यामुळे तुमच्या अॅक्टिव्हिटीसंदर्भात तुम्हाला द्यावीशी वाटते त्याहून अधिक माहिती त्यांना मिळू शकेल.
वापर नसताना... सायबरगुन्हेगारांनी तुमच्या उपकरणांचा वापर करून त्यातील त्रुटी शोधू नयेत यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे वापर नसताना उपकरणे बंद करून ठेवणे.
फाइंड माय फोन... तुमच्याकडे आयफोन, आयपॅड किंवा आयपॉड टच असेल तर तुम्ही फाइंड माय आयपॅड, फाइंड माय आयफोन किंवा फाइंड माय अॅप वापरू शकता. या सुविधेमुळे तुमचे उपकरण चोरीला गेल्यास, हरवल्यास तुम्ही तो शोधू शकता आणि त्यावरील माहिती काढून टाकू शकता.
वापरासाठी सज्ज व्हा नवी उपकरणे कार्यक्षमता, सोय आणि आयुष्यात आनंद आणतात. पण हे नवे तंत्रज्ञान वापरात आणण्यापूर्वी तुमचे स्मार्ट घर सुरक्षित आहे आणि तुमची उपकरणे ऑनलाइन खासगीपणा आणि सुरक्षितता जपण्याच्या दृष्टीने सज्ज आहेत, याची खातरजमा करून घेणे केव्हाही उत्तम! (वरील सर्व टीप्स नॉर्टन लाईफलॉककडून)