Specifications, Features Of Samsung W2019 Android Flip Phone With Dual Super Displays
असे काय आहे या दोन लाखांच्या फोनमध्ये....सॅमसंगने आयफोनलाही टाकले मागे By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 03:57 PM2018-11-12T15:57:33+5:302018-11-12T16:01:07+5:30Join usJoin usNext Samsung ला पहिला फोल्डेबल मोबाईल लाँच करता आला नसला तरीही कंपनीने नव्या Flip Phone W2019 फोनला लाँच करून प्रसिद्धी मिळविली आहे. या फोनची किंमत तर अॅपलच्या नव्या आयफोननाही मागे टाकणारी आहे. तब्बल 1.90 लाख रुपये. असे आहे तरी काय या मोबाईलमध्ये...चला पाहुया. हा फोन गेल्या वर्षी लाँच केलेल्या W2018 Flip Phone चे अद्ययावत मॉडेल आहे. या फोनला सध्या चीनमध्येच लाँच करण्यात आलेले असले तरीही अन्य बाजारांत कधी लाँच केले जाईल याबाबत स्पष्टता नाही. या नव्या फोनमध्ये चांगले हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ड्युअल रिअर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. Flip Phone W2019 ला दोन नवीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. पहिले 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असे आहे. तर दुसरा व्हेरिअंट 6 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असे आहे. चीनमध्ये सुरुवातीची किंमत 18999 चीनी युआन म्हणजेच 1.90 भारतीय रुपये एवढी आहे. ही किंमत 128 जीबी स्टोरेज स्पेसच्या व्हेरिअंटची आहे. Flip Phone W2019 या फोनला रोज गोल्ड आणि प्लॅटिनम अशा दोन रंगांत लाँच करण्यात आले आहे. या फोनचे आगाऊ बुकिंग सुरु झाले आहे 4.2 इंचाचा S-AMOLED FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. पिक्सल रिझोल्यूशन 1920 x 1080 आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. मात्र, यामध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सलच्या सेन्सरचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनमध्ये फुल एचडी स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉडिंगही करता येते. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. माइक्रोएसडी कार्डचा स्लॉट देण्यास आलेला नाही. फोनला उर्जा देण्यासाठी 3070 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 85 तासांचा स्टँडबाय टाईम आणि 280 तासांचा टॉकटाईम देण्य़ास सक्षम आहे. अँड्रॉईड 8.1 ओरिओची ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आलेली आहे. टॅग्स :सॅमसंगमोबाइलsamsungMobile