Story about whatsapp hack otp scam whatsapp web hack two step verification
'या' पद्धतींनी होऊ शकतं आपलं WhatsApp अकाउंट हॅक; इतर कुणी तुमचं चॅट तर वाचत नाही ना? असा लावा तपास By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 25, 2020 05:47 PM2020-12-25T17:47:23+5:302020-12-25T17:58:10+5:30Join usJoin usNext खरे तर WhatsApp हॅक करणे थोडे कठीनच आहे. मात्र, कुठल्याही पद्धतीची हॅकिंग अशक्य नाही. आम्ही आपल्याला काही अशा पद्धती सांगणार आहोत, ज्या अत्यंत बेसिक आहेत आणि त्यांचा वापर कुणीही आपल्या विरोधात वाईट हेतूने करू शकते. सर्वप्रथम आपण आपल्या WhatsApp मध्ये जाऊन चेक करा, की कुणी आपले WhatsApp तर अॅक्सेस करत नाही ना. हे करण्यासाठी WhatsApp सेटिंग्समध्ये जाऊन WhatsApp Web/Desktopवर टॅप करा. जर आपण WhatsApp Web ओपन केलेले नसेल आणि आपल्याला येथे लॉगड इन दिसत असेल तर समजून जा, की आपले चॅट कुणीतरी वाचले आहेत. यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे तत्काळ लॉग आऊट करायचे आहे. गूगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत, जे व्हॉट्सअॅपच्या या फिचरचा फायदा घेतात. आपल्याच जवळची एखादी व्यक्ती या अॅप्सच्या माध्यमाने आपले WhatsApp सातत्याने अॅक्सेस करेल आणि आपल्याला याची भनकही लागणार नाही. मात्र, यासाठी अटॅकरला टार्गेट डिव्हाइसच्या फिजिकल अॅक्सेसची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे, लोक काही मिनिटांसाठी एकमेकांना आपला मोबाईल अगदी सहजपणे देतात. मात्र, याच काही मिनिटांच्या काळात आपले व्हॉट्स अॅप इतर कुणी पाहत असेल. यामुळे WhatsApp Web फीचर अत्यंत काळजीपूर्वक वापरावे. WhatsApp स्पाय करण्याची आणखी एक दुसरी सोपी पद्धत, म्हणजे, अटॅकर्स अनेक वेळा टार्गेट डिव्हाईसचा अॅक्सेस घेतात. येथे अटॅकर कुणीही असू शकतो, तो तुमच्या ओळखीचाही असू शकतो. तो वाईट हेतूने आपला फोन घेऊन चॅट्सना थेट आपल्या ईमेलवर एक्स्पोर्ट करू शकतो. याला काही सेकंदाचाच वेळ लागतो. WhatsApp OTP स्कॅम - हा स्कॅम नुकताच चर्चेत आला आहे. मात्र, अटॅकर्सनी यापूर्वीही याचा वापर केला आहे. खरेतर, या स्कॅमध्ये अटॅकर्स स्वतःला इमरजन्सी असल्याचे सांगून आपल्या फोनवर मिळालेला ओटीपी मागतात. हा ओटीपी आपल्या व्हॉट्सअॅपचा असतो. जे ते अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतर आपण त्यांना ओटीपी देताच आपले व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होऊ शकते. यानंतर थोडा वेळासाठीही आपले व्हॉट्सअॅप अकाउंट त्यांना मिळाले, तर ते तुमचे सर्व चॅट्स आपल्या ईमेल आयडीवर एक्स्पोर्ट करू शकतात. यानंतर आपल्याला ब्लॅकमेलही केले जाऊ शकते. याशिवाय इतरही काही पद्धती आहेत, ज्याच्या सहाय्याने आपले WhatsApp हॅक केले जाऊ शकते. मात्र, सर्वसाधारणपणे त्या पद्धतींचा वापर कुठलाही हॅकर करत नाही. मात्र, त्याच्या सहाय्याने अत्यंत गंभीर हॅकिंग केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, इस्रायलची कंपनी NSO ग्रूपने तयार केलेल्या कथिक स्पाय वेअरने हाय प्रोफाईल व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले जाऊ शकतात. हे टूल सर्वांसाठीच उपलब्ध नसते. अशाच काही इतरही पद्धती आहेत. मात्र, आता यापासून कशा पद्धतीने बचाव केला जाऊ शकतो हे पाहूयात. आपल्या फोनमधील WhatsApp लॉक करून ठेवा. याच बरोबर आपल्या व्हॉट्सअॅपमध्ये टु स्टेप व्हेरिफिकेशन अनेबल करून ठेवा. या शिवाय आपल्या चॅट्सच्या बॅकअपला आठवणीने आपल्या ईमेल आयडीमध्ये सिक्योअर करून ठेवा. अथवा हे कंप्यूटरमध्ये डाउनलोड करून डेलिटही करू शकता.टॅग्स :व्हॉट्सअॅपमोबाइलWhatsAppMobile