There are many changes in WhatsApp, you know how good it is ...
व्हॉट्सअॅपमध्ये झाले अनेक बदल, जाणून घ्या तुमच्या किती फायद्याचे... By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:21 PM2019-02-12T23:21:03+5:302019-02-12T23:32:53+5:30Join usJoin usNext व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅपमध्ये अनेक नवीन फिचर येत आहेत. आता अॅपमध्ये अनेक बदल केले जाणार असल्याचे समोर आले आहे. WaBetaInfoच्या ट्विटमध्ये सध्याच्या व्हॉट्सअॅप सेटिंगच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Account, Chats, Notification, Payments, Data & Storage, Invite a friend नंतर Help असं ऑप्शन दिसतं. नव्या डिझाइनमध्ये यात थोडा क्रमप्राप्त बदल करण्यात आला आहे. याआधी Accounts च्या खाली Privacy, Security, Two-Step verification, change number असं दिसायचं. मात्र आता त्याच्यासोबत त्याचं चिन्हसुद्धा पाहायला मिळणार आहे. जेव्हा व्हॉट्सअॅप युजर्स स्वत:च्या प्रोफाईलवर जातील तेव्हा Name, About, आणि Phone अशा कॅटेगरी बघायला मिळतील. हे अपडेट बिटा व्हर्जनच्या 2.19.45 साठी देण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडीओ लिंक पाहण्यासाठी त्यावर क्लिक केल्यावर दुसरं ब्राऊजर ओपन होतं. पण आता व्हॉट्सअॅपने यात बदल केला असून व्हिडिओचं फिचर अपडेट केलं आहे. अॅण्ड्रॉइड फोनमध्ये हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट 2.18.380 व्हर्जनवर काम करतं. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. याआधी फक्त व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या व्हिडिओ फक्त पाहता येत होत्या, पण आता facebook, Youtube, Instagram यावरील व्हिडीओ लिंकसुद्धा व्हॉट्सअॅपमध्ये सहजरीत्या पाहता येणार आहेत. चॅट ऑप्शनमध्ये Wallpaper, Chat Backup, Chat History समोर चिन्ह आणि Help पर्यायानंतर FAQ, Contact Us, Terms and Privacy Policy, App Info यातही मोठे बदल केले आहेत. टॅग्स :व्हॉटसअॅपWhatsApp