कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल By सिद्धेश जाधव | Published: December 27, 2021 06:31 PM 2021-12-27T18:31:57+5:30 2021-12-27T18:48:00+5:30
Smartphone Over Heating: स्मार्टफोनचा वापर फक्त कॉल्स पुरता राहिलेला नाही. सध्या फोन बँक, टीव्ही, चित्रपटगृह आणि गेमिंग कन्सोलचं देखील काम करतो. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर वाढतो आणि डिवाइस गरम होऊ लागतो. हेवी गेम खेळताना आणि ब्राउजिंग करताना सर्वच फोन थोडेफार गरम होतात. परंतु डिवाइस जास्त गरम झाल्यास तुमच्या फोनमध्ये समस्या असू शकते.
बऱ्याचदा चार्जिंग दरम्यान देखील फोन गरम होतो. चार्जिंग सुरु असताना फोन गरम होऊन स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु या ओव्हर हीटिंगवर देखील अनेक उपाय आहेत.
कधी-कधी तुमच्या फोनची स्टोरेज फोनला हिट करते तर कधी फोनच्या सिस्टम कोडमध्ये बग असू शकतो. चला जाणून घेऊया स्मार्टफोनच्या ओव्हर हीटिंगची कारणं आणि त्यावरील उपाय.
स्मार्टफोन गरम होण्याची कारणं 1.स्मार्टफोनमध्ये जास्त अॅप्स आणि गेम्स डाउनलोड केल्यामुळे ओव्हर हीटिंगची समस्या येऊ शकते. 2.फोनचं कॉम्युनिकेशन यूनिट आणि कॅमेरा देखील तापमान वाढवू शकतात. 3.अनेक फोन चार्जिंग, ब्राउजिंग आणि कॉलिंग दरम्यान देखील तापतात.
उपाय: नको असलेले फंक्शन बंद करा गरज नसल्यास डेटा GPS, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक फंक्शन बंद करावेत. हे फंक्शन्स फक्त बॅटरी खात नाहीत तर फोनचे तापमान वाढवण्यास देखील कारणीभूत असतात.
उपाय: एकाच वेळी अनेक अॅप्स वापरणं टाळा फोनच्या बॅकग्राउंडमध्ये एक साथ अनेक अॅप्स सुरु ठेवल्यास देखील फोन गरम होऊ शकतो. फोनचा रॅम वेळोवेळी क्लीन करत रहा.
उपाय: अधिकृत चार्जरचा वापर करा चार्जिंग करताना अनधिकृत चार्जरचा वापर केल्यास स्मार्टफोन हिट होऊ शकतो. त्यामुळे कंपनीने सोबत दिलेला किंवा कंपनीच्या अधिकृत स्टोर किंवा वेबसाईटवरून घेतलेला चार्जर वापरावा.
फोन अपडेटेड ठेवा फोनचे अॅप्स तसेच ऑपरेटिंग सिस्टम अपडेटेड ठेवावी. कधी-कधी सॉफ्टवेयर मधील बग ओव्हरहीटिंगचे कारण ठरू शकतो. हा बग अपडेटमधून दूर केला जाऊ शकतो.