this dangerous scam can steal your instagram account
Instagram युजर्स सावधान! 'या' एका चुकीमुळे तुमचे अकाउंट हॅक होऊ शकते By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:10 PM2022-03-02T14:10:20+5:302022-03-02T14:16:25+5:30Join usJoin usNext Instagram : अनेक सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सनी याबाबत आधीच इशारा दिला आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप इंस्टाग्राममध्ये (Instagram) एक नवीन स्कॅम सुरू आहे. या स्कॅममध्ये युजर्सना टार्गेट करून त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात येक आहे. म्हणजेच, इंस्टाग्राम अकाउंटचा अॅक्सेस स्कॅमरकडे जातो. याबाबत इंस्टाग्राम युजर्संना माहितीही होत नाही. हा स्कॅम पहिल्यांदा जून 2021 मध्ये रिपोर्ट करण्यात आला होता. आता हा अॅक्टिव्ह झाला आहे. तुम्ही या स्कॅममध्ये बळी पडल्यास, तुमचे लॉगिन डिटेल्स फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतील. अनेक सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सनी याबाबत आधीच इशारा दिला आहे. या स्कॅममध्ये फसवणूक करणारे पहिल्यांदा युजर्सला इंस्टाग्रामवर लिंक पाठवतात. यामध्ये कॅप्शन खूप मनोरंजक असते, ज्यामुळे युजर्स लिंक उघडण्याची चूक करतात. या लिंकचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर असे दिसते की, ही एक इंस्टाग्राम पोस्ट आहे परंतु, तसे नाही. व्हिडिओ शेवटी आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही व्हिडिओ लिंकवर क्लिक करताच, तुम्हाला इंस्टाग्राम लॉगिन पेजवर नेले जाईल. या नवीन पेजवर यूजरला सांगण्यात आले आहे की ते इन्स्टाग्राम अकाउंटवर लॉग इन केल्यानंतरच पोस्ट पाहू शकतात. इथून स्कॅम सुरू होतो. युजर्सला बनावट इंस्टाग्राम लॉगिन पेजवर नेले जाते. हे अगदी इंस्टाग्रामसारखे दिसते, म्हणून बहुतेक युजर्स फसवले जातात. यामध्ये, लॉगिन डिटेल्स दिल्यानंतर युजर्सचे लॉगिन डिटेल्स स्कॅमरपर्यंत पोहोचतात. यानंतर, ते युजर्सचे अकाउंट कंट्रोल करण्यास सुरवात करतात आणि युजर्सला याबद्दल माहिती नसते. त्यामुळे युजर्संनी अशा दुर्भावनापूर्ण आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहणे आवश्यक आहे.टॅग्स :इन्स्टाग्रामतंत्रज्ञानInstagramtechnology