This feature of iPhone saves from spying, hacking; How to use Lockdown Mode?
हेरगिरी, हॅकिंगपासून वाचवतं iPhone चं हे फिचर; Lockdown Mode कसा वापरायचा? By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 05:18 PM2023-10-31T17:18:57+5:302023-10-31T17:24:08+5:30Join usJoin usNext आज सकाळपासून Apple, iPhone आणि सुरक्षेला धोका याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक विरोधी नेत्यांना त्यांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे मेसेज आले आहेत. स्टेट स्पॉन्सर्ट अटॅक नावाने हा मेसेज आहे. म्हणजे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न सरकारी प्रायोजित हल्लेखोराने केला आहे. Apple ने असे एक फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्सला असे अलर्ट मिळतात. अशा परिस्थितीत आयफोन वापरणाऱ्यांनी Apple चे एक फीचर ताबडतोब चालू करावे. या फीचरच्या मदतीने युजरचे कमीत कमी नुकसान होणार आहे. आम्ही Lockdown Mode बद्दल बोलत आहोत. जसं या फिचरचं नाव आहे तसं त्याचे काम आहे. हा एक पर्यायी मोड आहे आणि त्यात अनेक संरक्षण उपलब्ध आहेत. हे फिचर केवळ निवडक लोकांसाठी डिझाइन केले गेले आहे जे डिजिटल धोके जास्त आहेत. बहुतेक लोक अशा प्रकारच्या धोक्याला बळी पडत नाहीत. हे फिचर ऑन केल्यानंतर, तुमचे डिव्हाइस पूर्वीसारखे काम करणार नाही. अटॅक टाळण्यासाठी, डिव्हाइस फिचर्स मर्यादित करते. यामुळे तुम्ही अनेक फीचर्स वापरू शकणार नाही. हे फिचर iOS 16, iPad OS 16, Watch OS 10 आणि macOS Ventura आणि नंतरच्या व्हर्जनवर देण्यात आले आहे. हे फिचर चालू करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसला लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या iPhone, iPad आणि Mac वर हे फिचर चालू करू शकता. iPhone अथवा iPad वर हे फिचर वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Setting मध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला Privacy & Security वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला लॉकडाउन मोड पर्यायापर्यंत स्क्रोल करावे लागेल. तुम्ही येथे क्लिक करून हे फिचर चालू करू शकता. यानंतर तुम्हाला डिव्हाइस रीस्टार्ट करावे लागेल आणि नंतर तुमचा पासकोड टाकावा लागेल. Mac वर हे फिचर चालू करण्यासाठी, तुम्हाला सिस्टम सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला Privacy & Security चा पर्याय मिळेल. यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून Lockdown Mode वर क्लिक करावे लागेल. iPhone आणि iPad वर तुम्हाला लॉकडाउन मोडचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करून तुम्ही फीचर चालू करू शकता. येथे तुम्हाला तुमचा यूजर पासवर्ड पुन्हा टाकावा लागेल. यानंतर यूजर्सला टर्न ऑन आणि रीस्टार्ट वर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे Mac वर लॉकडाउन मोड चालू होईल आज देशाच्या राजकारणात मोबाईल हॅकिंगचा मुद्दा चांगलाच वेगाने गाजत आहे. खरं तर, मंगळवारी सकाळी काही नेत्यांनी स्क्रीनशॉट शेअर केले की सरकार त्यांचा Apple मोबाइल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला. अॅपलचा आयफोन वापरणारे खासदार असदुद्दीन ओवेसी, महुआ मोईत्रा, शशी थरूर आणि राघव चढ्ढा यांच्यासह अनेकांनी ट्विट केले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत Apple ला देखील कथित अचूक माहितीसह तपासात सामील होण्यास सरकारने सांगितले आहे.टॅग्स :अॅपलApple Inc