अरे व्वा! भरमसाठ वीज बील येतंय पण आता नो टेन्शन; 'या' पद्धतीने करा पैशांची मोठी बचत By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:22 PM 2022-06-13T15:22:18+5:30 2022-06-13T15:34:39+5:30
Electricity Bill : जर तुमचंही बिलही जास्त येत असेल तर आज आम्ही तुम्हाला असं काही सोपे आणि सहज करता येण्यासारखे उपाय सांगत आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही विजेची बचत करू शकता. विजेचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. घरातील सर्वच उपकरणं ही सतत चालूच असतात. अशातच वीज बिल जास्त आलं तर घरखर्चात वाढ होते. अशा वेळी विजेचा वापर कमी होऊन बिल कमी यावं यासाठी काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटत असतं.
अनेक जण विजेची बचत देखील करतात. जर तुमचंही बिलही जास्त येत असेल तर आज आम्ही तुम्हाला असं काही सोपे आणि सहज करता येण्यासारखे उपाय सांगत आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही विजेची बचत करू शकता.
प्रत्येकाच्या घरामध्ये फॅन, लाईट, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन यासह अनेक विजेवर चालणाऱ्या गोष्टी असतात. यामुळेच बिल जास्त येतं. कशाप्रकारे तुम्ही विजेची बचत करायची हे जाणून घेऊया...
योग्य बल्ब वापरा नेहमीच्या बल्बऐवजी कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लाइट (CFL), लाइट एमिटिंग डायोड (LED) बल्ब वापरा. हे बल्ब कमी वीज वापरतात आणि त्यामुळे तुमचा वीज वापर कमी होऊन बिल कमी होईल. तसेच अनावश्यकरीत्या लाईट चालू ठेवू नका.
उपकरणं नेहमी चार्जिंगवर ठेवू नका चार्जर लावून विजेचा स्विच ऑन करून ठेवलेला असतो, मात्र, त्याला डिवाईस (मोबाईल फोन, लॅपटॉप आदी) जोडलेला नसतो, तेव्हाही वीज खर्च होते. अनेकांना अशा पद्धतीने डिवाईस जोडलेला नसताना चार्जर प्लग इन करून तसाच सोडण्याची सवय असते.
विजेचा वापर आणि बिलही यामुळे वाढतं. अशा परिस्थितीत, जेव्हा उपकरण प्लगमधून काढलं जातं, तेव्हा नेहमी आठवणीने स्विच बंद करा. अशा प्रकारे तुमचा वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होईल.
फ्रीज पुन्हा पुन्हा उघडू नका उन्हाळ्यात फ्रीजची खूप गरज असते. बर्फ किंवा थंड पाणी हवं असतं. इतरही अन्नपदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जातात. पण वीज बचत करण्यासाठी फ्रीज वारंवार उघडणं टाळा. तसंच, फ्रीजचा दरवाजा फार वेळ उघडा ठेवू नये.
एनर्जी सेव्हिंग मोड फोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातूनही घराची वीज वाचवता येते. यासाठी फोन, लॅपटॉप नेहमीच पॉवर सेव्हिंग मोडवर ठेवा.
एसी गरम होत असताना आपण एसी लावतो. परंतु, जेव्हा जेव्हा तुम्ही एसी चालू करता, तेव्हा लक्षात ठेवा की, त्याचं तापमान 25 डिग्री ठेवा. यामुळे एसीचा कंप्रेसर सतत चालू राहणार नाही आणि तुमच्या विजेचीही बचत होईल.