सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया

By सिद्धेश जाधव | Published: December 30, 2021 06:05 PM2021-12-30T18:05:13+5:302021-12-30T18:14:17+5:30

Second Hand Smartphone: नवीन स्मार्टफोन घेणं सोप्प आहे, परंतु जुना आणि वापरलेला स्मार्टफोन विकत घेणं कठीण काम आहे. पुढे आम्ही अशा गोष्टींची माहिती दिली आहे ज्या तुम्हाला सेकंड हँड स्मार्टफोन विकत घेण्यासाठी मदत करू शकतात.

जर तुम्ही जुना स्मार्टफोन म्हणजे कि सेकंड हँड स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत आहात का? वापरलेला स्मार्टफोन विकत घेताना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पुढे आम्ही त्यांची माहिती दिली आहे.

फोन मालकाने विकत घेतला आहे कि नाही हे बिल वरून समजू शकतं. एखादा फोन चोरीचा देखील असू शकतो. त्यामुळे सेकंड हँड फोन विकत घेताना त्याचं बिल जरूर मागा.

फोनच्या बिल सोबतच त्याचा बॉक्स आणि चार्जर आणि इयरफोन्स अशा अ‍ॅक्सेसरीज देखील जुन्या मालकाकडून घेण्यास विसरू नका. ओरिजनल चार्जर असल्यास तुमच्या फोनच्या बॅटरीचं आयुष्य वाढू शकतं.

फोन विकत घेण्याआधी स्पिकर आणि चार्जिंग पोर्ट बघून घ्या. तसेच चारही कॉर्नरवरील डॅमेज चेक करा. विशेष म्हणजे फोनचा कव्हर काढून फोन कोणत्या अवस्थेत आहे ते बघा. डॅमेज लपवण्यासाठी फोन कव्हरचा वापर केला जाऊ शकतो.

जुन्या फोनवर डुप्लीकेट स्क्रीन लावून तो विकण्याचा प्रकार केला जातो. डिस्प्लेचा टच चेक करा. जमल्यास एखाद्या स्मार्टफोन रिपेयर करणाऱ्या व्यक्तीकडून टच टेस्ट करून घ्या.

कॅमेऱ्यातून वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये फोटो काढून बघा. कॅमेरा लेन्स सुस्थितीत आहे कि नाही ते चेक करा. घाई गडबडीत सेल्फी कॅमेरा चेक करायला विसरू नका.