घर होईल काश्मीर सारखं थंड; एसीमधून जास्त कुलिंग मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:28 PM2022-04-16T18:28:54+5:302022-04-16T18:39:03+5:30

उन्हळ्यात गर्मीतून सुटका फक्त एसीची हवा करते. परंतु एसीनं रूम नीट थंड करावा म्हणून काही सोप्प्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या एसीचा पुरेपूर फायदा घेता येईल.

खोलीमधून हवा बाहेत जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे खिडक्या आणि दरवाजा बंद करून घ्यावा. वारंवार उघडझाप करू नये.

कमी कुलिंग होण्यामागे हे एक महत्वाचं कारण आहे. तुमच्या एसीच्या क्षमतेपेक्षा जर खोली मोठी असेल तर कुलिंग चांगली होत नाही. त्यामुळे खोलीसाठी योग्य क्षमतेच्या एसीची निवड करा.

जर खोलीत ऊन थेट येत असेल तर कुलिंग लवकर होत नाही. त्यामुळे पडदा टाकून खोलीत येणारं ऊन टाळता येईल. तसेच स्प्लिट एसीमधील बाहेरचं युनिट देखील उन्हात ठेऊ नये. ते युनिट सावलीत ठेवावं.

एसीचे फिल्टर्स साफ असावेत. चांगल्या कुलिंगसाठी पंधरा दिवसांतून एकदा या फिल्टर्समध्ये अडकेलाल कचरा साफ करावा.

सध्या एयर कंडिशन्समध्ये कुल, ड्राय, हॉट, फॅन आणि असे अनेक मोड असतात. यातील कुल मोड ऑन आहे ना याची खात्री करून घ्या.

तुमच्या एसीची एफिशियंसी तुमच्या खोलीच्या आकारावर अवलंबून असते. परंतु खोलीत असलेल्या माणसांच्या संख्येवर देखील कुलिंग अवलंबुन असते. थोडक्यात जास्त माणसं म्हणजे कमी कुलिंग.

चांगल्या कुलिंगसाठी एसीची नियमित सर्व्हिस करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची एसी चांगली कुलिंग देते आणि तिचं आयुष्य वाढतं.