विजेचं बिल जास्त येतं? फॉलो करा 'या' टिप्स; AC वापरुनही तुमचं विज बिल थेट निम्म्यावर येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:56 PM2022-03-08T16:56:45+5:302022-03-08T17:09:29+5:30

लाइटचं बिल जास्त येतंय? मग ते कमी करण्याच्या टिप्स जाणून घ्या...

Tips To Reduce Electricity Bill: उन्हाळ्याचा मोसम आता सुरू होण्याआधीच घामानं अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात जिथं विजेचं बिल कमी येतं. तर उन्हाळ्यात बिल हजारोंचं बिल येतं. कारण याच काळात एसी, फ्रिज, कूलर आणि वॉशिंग मशीनसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सर्वाधिक वापर करतो. त्यामुळे या काळात अधिक बिल येणं सहाजिक आहे.

अधिकचं इलेक्ट्रीसिटी बिल म्हणजे खिशावर अधिकचा भार. पण काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचं इलेक्ट्रिसीटी बिल तब्बल ५० टक्क्यांनी कमी करता येऊ शकतं.

भारतात सोलर पॅनेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात एका महिन्यात ३० दिवस ऊन पडतं. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता. ही एकवेळची गुंतवणूक आहे, परंतु यामुळे तुमचे वीज बिल कमी होऊ शकते. ऑनलाइन रिसर्च करून तुम्ही ते तुमच्या घरानुसार इन्स्टॉल करू शकता.

एलईडी लाइटसाठी कमी वीज लागते आणि चांगला प्रकाश देखील मिळतो. त्याच वेळी, तुम्ही 5 स्टार रेटिंगसह उपकरणं घेऊ शकता. त्यातही तुमच्या विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होईल.

बल्ब आणि ट्यूबलाइटपेक्षा सीएफएल पाचपट विजेची बचत करते, त्यामुळे ट्यूबलाइटऐवजी सीएफएल बल्ब वापरा. ज्या खोलीत तुम्हाला प्रकाशाची गरज नाही, तो बंद करा. इन्फ्रारेड सेन्सर, मोशन सेन्सर आणि डिमर यासारख्या गोष्टी वापरा.

उन्हाळ्यात एसीपेक्षा सीलिंग आणि टेबल फॅनचा जास्त वापर करा. त्याची किंमत 30 पैसे प्रति तास आहे, तर एसी 10 रुपये प्रति तास असा चालतो. जर तुम्हाला एसी वापरायचा असेल तर 25 डिग्री तापमानावर सेव्ह करून वापरावा. यामुळे विजेचा वापरही कमी होईल. तसेच ज्या खोलीत एसी चालू आहे, त्या खोलीचा दरवाजा बंद करा.

फ्रीजवर मायक्रोवेव्हसारख्या वस्तू अजिबात ठेवू नका. याचा परिणाम जास्त वीज वापरावर होतो. फ्रीज थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. रेफ्रिजरेटरभोवती हवेच्या प्रवाहासाठी पुरेशी जागा द्या. फ्रीजमध्ये गरम अन्न ठेवू नका. आधी थंड होऊ द्या.

संगणक आणि टीव्ही चालू केल्यानंतर मॉनिटरला स्पीड मोडमध्ये ठेवा. फोन आणि कॅमेरा चार्जर वापरल्यानंतर, तो प्लगमधून अनप्लग करा. प्लग इन केल्यावर, जास्त वीज वापरली जाते.