WhatsAppची चूक की कमी? लोक या फिचरचा वापर करून ठेवतायत पार्टनरवर नजर! By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:19 PM 2021-04-15T16:19:44+5:30 2021-04-15T16:29:54+5:30
आपण कुणाचा नंबर सेव्ह केला नसला तरीही ती व्यक्ती ऑनलाइन आहे, किंवा नाही, याची माहिती आपल्याला मिळू शकते. (Trackers are using automated apps to track women online on whatsapp) भारतात प्रायव्हसी वादानंतरही WhatsApp एक अत्यंत लोकप्रिय मॅसेजिंग अॅप आहे. भारत ही व्हॉट्सअॅपची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हॅकर्स आणि स्कॅमर्सची नजरही WhatsAppवर राहतेच. ब्लॉक नसाल, तर WhatsApp वर कोन ऑनलाईन आहे, हे कुणीही पाहू शकते.
Traced च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, की सायबर अटॅकर्स WhatsApp ऑनलाइन स्टेटस ट्रॅकर वेबसाइटचा वापर करत आहेत. याच्या सहाय्याने ते, कोण केव्हा WhatsApp वर ऑनलाईन येते यावर नजर ठेऊ शकतात. याच बरोबर, इतर लोकांवरही लक्ष ठेऊन, कोण कुणाला आणि केव्हा मेसेज करत आहे, याचाही अंदाज लावला जाऊ शकतो.
एखादा युझर जेव्हा व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन येतो, तेव्हा त्याची प्रोफाईल लगेच दिसते. याच बरोबर ऑनलाइन स्टेटसही दिसते. कुठलाही युझर हे पाहू शकतो.
आपण कुणाचा नंबर सेव्ह केला नसला तरीही ती व्यक्ती ऑनलाइन आहे, किंवा नाही, याची माहिती आपल्याला मिळू शकते. WhatsApp स्टेटस ट्रॅकर यूझर्सच्या स्टेटसला सातत्याने ट्रॅक करत असते.
Traced नुसार, केवळ नंबर टाकूनच यूझरने व्हॉट्सअॅपवर किती वेळ घालवला हे समजू शकते. एवढेच नाही, तर यूझर व्हॉट्सअॅपवर किती वेळ ऑनलाइन होता, याची माहितीही मिळवता येऊ शकते.
सध्या, असे अनेक अॅप उपलब्ध आहेत, जे पार्टनर अथवा मुलांवर नजर ठेवण्याचा दावा करतात. याच्या सहाय्याने त्यांची मुले अथवा पार्टनर कुणाशी बोलत आहेत, याची माहिती मिळवली जाऊ शकते.
सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे, या प्रकारच्या हेरगिरीसाठी विक्टिमच्या स्मार्टफोनमध्ये काहीही इंस्टॉल करण्याची आवश्यकता नाही. केवळ आपल्या फोनमध्ये अॅप इंस्टॉल करून ज्यांच्यावर नजर ठेवायची आहे, त्यांचा मोबाइल नंबर टाकावा लागेल.
या अॅप्सच्या सहाय्याने आपल्याला, युझर केव्हा आणि किती वेळा ऑनलाइन येतो हेही समजेल. यामुळे महिलांच्या हॅरॅसमेन्टची भीतीही वाढते.
हे अॅप्स मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे, असे गूगलने म्हटले आहे. या अॅप्सच्या सहाय्याने संबंधित व्यक्तीला माहिती असल्याशिवाय ट्रॅक केले जाऊ शकत नाही. तसेच, एखादे ट्रॅक झालेच, तर युझरला डेटा ट्रान्समिशनचे नोटिफिकेशन मिळते.
गूगलने दावा केला असला तरी, अशा अनेक वैबसाईट्स आहेत, जेथे हे अॅप्स डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपदेखील या अॅप्स ट्रॅकिंगपासून युझर्सना वाचवू शकत नाही. कारण व्हॉट्सअॅपकडे यासंदर्भात कसल्याही प्रकारची सेटींग अद्याप उपलब्ध नाही. कंपनीने युझर्सच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर काही पावले उचलणे आवश्यक आहे.