6000mAh पर्यंतची बॅटरी असलेले हे Redmi फोन्स देतील दिवसभराचा बॅकअप; किंमत 12,500 पासून सुरु
By सिद्धेश जाधव | Updated: February 1, 2022 19:30 IST2022-02-01T19:20:11+5:302022-02-01T19:30:36+5:30
Big Battery Redmi Phone: जर तुम्ही मोठी बॅटरी असलेले स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही रेडमीचे काही स्मार्टफोन्स विकत घेण्याचा विचार करू शकता.

ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून Redmi चे काही फोन्स स्वस्तात विकत घेता येतील. ज्यात मोठी बॅटरी आणि दमदार स्पेसिफिकेशन्स मिळतात.
Redmi Note 10 Pro 5G
या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळतो. यात Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसरची पॉवर मिळते, सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. 5020mAh ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते. या फोनवर 10 टक्क्यांची सूट मिळत आहे.
Redmi Note 11T 5G
या मोबाईलमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत MediaTek Dimensity 810 प्रोसेसर, 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. 5000mAh बॅटरी असलेला हा फोन 50MP प्रायमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याची किंमत 16999 रुपयांपासून सुरु होते. अॅमेझॉनवरून हा विकत घेतल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल.
Redmi Note 10S
फोनमध्ये 6.43 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 64MP चा मेन रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याला MediaTek Helio G95 ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतची स्टोरेज मिळते. 5000mAh च्या बॅटरीसह येणारा हा मोबाईल 14,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. अॅमेझॉनवर City Union बँकेच्या कार्डवर 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळेल.
Redmi Note 10T 5G
हा एक 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन आहे. ज्यात 48MP कॅमेरा आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले मिळतो. सोबत Mediatek Dimensity 700 प्रोसेसर, 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. याची किंमत 14999 रुपयांपासून सुरु होते. यावर देखील 10 टक्क्यांची सूट मिळत आहे.
Redmi 10 Prime
हा 6.5 इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ज्यात 6000mAh ची मोठी बॅटरी मिळते. MediaTek Helio G88 प्रोसेसरवर चालणार हा फोन 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 12499 रुपयांपासून सुरु होते. हा फोन अॅमेझॉनवरून विकत घेतल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल.