अरे व्वा! इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट; घरबसल्या काही मिनिटांत 'असं' भरा वीज बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 10:50 AM2022-11-12T10:50:35+5:302022-11-12T10:58:07+5:30

तुम्ही तुमचं मोबाईल बिल इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI द्वारे देखील भरू शकता. 123PAY UPI सेवेच्या मदतीने तुम्ही हे करू शकता.

इंटरनेटशिवायही तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सुविधा वापरू शकता. तुम्ही तुमचं मोबाईल बिल इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI द्वारे देखील भरू शकता. 123PAY UPI सेवेच्या मदतीने तुम्ही हे करू शकता. घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत झटपट बिल भरू शकता.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने (NPCI) अलीकडेच जाहीर केलं आहे की 123PAY वीज बिल भरणा सेवा आता 70 पेक्षा जास्त वीज मंडळांसाठी उपलब्ध असेल. 123PAY सेवा आणि भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) वापरून, ग्राहक त्यांचे वीज बिल जलद आणि सहज भरू शकतील. वीज बिल थेट बँक खात्यातून भरता येतं.

NPCI च्या प्रेस रिलीझनुसार, वीज बिल भरणा 123PAYच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. वीज बिल भरण्यासाठी 080-4516-3666 किंवा 6366 200 200 या क्रमांकांवर कॉल करा.

युजरला वीज बिल भरण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर युजरला ज्या वीज मंडळाला पेमेंट करायचे आहे त्याचे नाव घ्यावे लागेल. युजरला कॉलवर विचारलेला ग्राहक क्रमांक आणि इतर तपशील प्रविष्ट करावे लागतील. त्यानंतर बिलाच्या थकबाकीची माहिती मिळेल.

पेमेंटसाठी युजरला आता UPI पिन टाकावा लागेल. '080 4516 3666' किंवा '6366 200 200' पेमेंट नंबरवर कॉल करून त्यांचे वीज बिल भरण्यास सक्षम असतील. या फोनवर लोक 10 प्रादेशिक भाषांमध्ये बोलू शकतात.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फीचर फोनसाठी 123PAY UPI सेवा तयार केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा सुरू केली होती. 123PAY सेवेच्या मदतीनं फीचर फोन वापरणारे डिजिटल व्यवहार करू शकतात.

यामध्ये फोन, मिस्ड कॉल ऑन इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्सच्या माध्यमातून ध्वनी आधारित प्रणालीची मदत घेता येईल. UPI पिन हा 4 ते 6 अंकी कोड असतो, जो तुम्ही मोबाईल अॅप किंवा IVR किंवा इतर कोणत्याही चॅनेलवर पहिल्यांदा नोंदणी करताना तयार करता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.