useful gadgets for your everyday life
दैनंदिन जीवनात 'हे' गॅजेट्स करणार मदत By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 06:27 PM2019-03-30T18:27:06+5:302019-03-30T18:32:54+5:30Join usJoin usNext स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र स्मार्टफोनप्रमाणेच असे अनेक गॅजेट्स आहेत ज्यांचा आपल्याला दैनंदिन जीवनात खूप उपयोग होत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मदत करणाऱ्या काही गॅजेट्सबाबत जाणून घेऊया. वेकअप लाइट अलार्म क्लॉक फिलिप्सने एक वेकअप लाइट अलार्म क्लॉक तयार केला आहे. सकाळी उठण्यासाठी हे अलार्म क्लॉक अत्यंत फायदेशीर ठरतं. याचा ब्राईटनेस थोड्या वेळाने वाढतो.हायटेक स्मार्ट थर्मोस्टेट हायटेक स्मार्ट थर्मोस्टेटच्या मदतीने घरातील तापमान सेट करण्यास मदत होते. स्मार्ट अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून बाहेर असाल तरी तुमच्या ड्रॉईंग रुमपासून बेडरुमपर्यंतचे तापमान सेट करता येते. इलेक्ट्रिक टॉवेल वॉर्मर अंघोळ केल्यानंतर उबदार टॉवेल अनेकांना हवा असतो. अशाच लोकांना इलेक्ट्रिक टॉवेल वॉर्मर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. स्लीप सिस्टम शांत झोप ही प्रत्येकालाच हवी असते. हॅलो सेंस स्लीप सिस्टम हे उपकरण शांत झोप मिळण्यास मदत करते. या उपकरणाच्या मदतीने बेडरुमची लाईट, तापमान, गोंधळ, वातावरण मॉनिटर करून त्याचा फिडबॅक दिला जातो. या फिडबॅकनुसार तुम्ही शांत झोप घेऊ शकता. अरोमाथेरेपी ऑइल डिफ्यूजर अरोमाथेरेपी ऑइल डिफ्यूजरने दिवसाची सुरुवात ही सुगंधी होते. अल्ट्रासोनिक ऑइल डिफ्यूजर नाइट लँपमध्ये बदलून रंगानुसार प्रतिसाद देतो. कॉफी मेकर सकाळी उठल्या उठल्या हातात तयार कॉफी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कॉफी मेकरच्या मदतीने आपल्याला कॉफी तयार मिळते. रात्री झोपण्याच्या आधी प्रोग्रॅमिंग सेट करून सकाळी तयार कॉफी मिळणार आहे. टॅग्स :तंत्रज्ञानtechnology