Using Xiaomi's Gadgets? Are they real or fake? Check it out
शाओमीची गॅजेटस् वापरताय? खरी आहेत की बनावट? असे तपासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:02 PM2020-01-06T19:02:48+5:302020-01-06T23:53:31+5:30Join usJoin usNext चीनची स्मार्टफोन कंपनीने भारतात कमी काळात चांगलाच जम बसविला आहे. स्मार्टफोनसोबत टीव्ही, वॉच, पॉवर बँक अशा अनेक प्रकारची उत्पादनेही या कंपनीने विकण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये स्पोर्ट शूजही आहेत. पण आता या उत्पादनांची बनावटही करण्यात येत आहे. शाओमीनेच ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे. शाओमीची उत्पादने खरेदी करताना ती खरी आहेत की खोटी हे तपासावे. फिटनेससाठीची उत्पादने Mi Fit अॅपसोबत काम करतात. तसेच अन्य स्मार्ट डिव्हाईसही कंपनीने दिलेल्या अॅपवर चालतात. बनावट गॅजेटना या अॅपचा सपोर्ट मिळत नाही. शाओमीची पॉवर बँक खरेदी करताना सिक्युरिटी कोड जरूर तपासावा. सिक्युरिटी कोड mi.com वर टाकून खरे-खोटेपणा तपासता येतो. ओरिजिनल बॅटरीवर Li-Poly चा उल्लेख असतो. तर बनावट बॅटरीवर Li-ion लिहिलेले असते. शाओमीने सांगितले की कंपनीचा लोगोही तपासावा. बनावट उत्पादनांवरील लोगो खऱ्या लोगोपेक्षा वेगळा असतो. कोणतेही उत्पादन खरेदी करतेवेळी त्याचा बॉक्स वेबसाईटवर जाऊन तसाच दिसतो का हे पहावे. जर वेगळा असेल तर ते उत्पादन करेदी करू नये. बनावट युएसबी केबल आणि अॅक्सेसरी दिसण्यास खराब असतात. तसेच क्वालिटीही खराब असते. ओरिजिनल उत्पादनांमध्ये चांगला दर्जा असतो. टॅग्स :शाओमीxiaomi