Vaio returns to India with new series of ultraportable laptops price starts at Rupees 66990
Vaio ची भारतात पुन्हा एन्ट्री, दोन लॅपटॉप लाँच; पाहा स्पेसिफिकेशन आणि किंमत By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 05:41 PM2021-01-15T17:41:40+5:302021-01-15T17:47:07+5:30Join usJoin usNext Vaio नं भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केलं असून त्यांनी दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. E-15 आणि SE-14 अशी ही मॉडेल्स आहेत. हे दोन्ही लॅपटॉप फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. दोन्ही लॅपटॉमध्ये विडोज १० आणि़ डॉल्बी ऑडियो प्रिमिअमचा सपोर्ट देण्यात आला आहे. डॉल्बी ऑडिओ प्रिमिअम हा एचडी साऊंड क्वालिटी देतो. तसंच यामध्ये ऑडिओ आणि गेमिंग एक्सपिरिअन्ससाठी स्मार्ट अॅम्प्लिफायरदेखील आहे. हाँगकाँगमधील कंपनी Nexstgo नं भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा Vaio चे लॅपटॉप लाँच केले आहेत. Vaio कॉर्पोरेशनसह कंपनीनं एक करारदेखील केला आहे. ही कंपनी Avita नोटबुक्सचीदेखील विक्री करते. Vaio E15 ची सुरूवातीची किंमत ६६,९०० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना हा लॅपटॉप ब्लॅक आणि टिन सिल्व्हर ऑप्शनमध्ये मिळेल. तर दुसरीकडे SE14 या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत ८४,६९० रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांना हा लॅपटॉप डार्क ग्रे आणि रेड कॉपर या कलर ऑप्शनमध्ये मिळेल. हे दोन्ही लॅपटॉप्स ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील. तसंच प्री ऑर्डरसाठीही ते लॅपटॉप उपलब्ध आहेत. Vaio E15 मध्ये नॅरो बेझल्ससह १५.६ इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात AMD Ryzen 5 आणि AMD Ryzen 7 हे प्रोसेसर्स देण्यात आले आहेत. या लॅपटॉपचं वजन १.७७ किलो इतकं आहे. तसंच हा लॅपटॉप १९.८९ एमएम इतका थीन आहे. संपूर्ण दिवस चालेल अशी याची बॅटरी लाईफ असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. Vaio SE14 मध्ये १४ इंचाचा फुलएचडी आयपीएस अँटी ग्लेअर डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये sland-style की-बोर्ड उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबीची हार्डडिस्क देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त Intel 5i हा चिपसेटही देण्यात आला आहे. युझर्सना आपल्या फिंगरप्रिन्टनंही हा लॅपटॉप अनलॉक करता येणार आहे. Vaio SE14 मध्ये १३ तासांचा बॅटरी बॅकअप मिळणार असल्याचा दावा केला आहे. तसंच एका तासात हा लॅपटॉप ७० टक्के चार्ज केला जाऊ शकतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे. कनेक्टिव्हीटीसाठी यात दोन USB टाईप-CTM पोर्ट्स, दोन USB 3.0 पोर्ट्स आणि एक HDMI पोर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त हा लॅपटॉप ४ स्पीकर डिझाईनसोबतही येतो. यात टॉप फायरिंग ड्युअल स्पिकर्स आणि डाऊन फायरिंग ड्युअल स्पिकर्सचा समावेश आहे. यात Ergo Lift hinge डिझाईन देण्यात आलं आहे. Read in Englishटॅग्स :लॅपटॉपतंत्रज्ञानभारतफ्लिपकार्टlaptoptechnologyIndiaFlipkart