Want to buy AC but confused? Read once this tips
उकाड्याने त्रस्त आहात? AC घ्यायचा विचार करताय...मग खरेदीपूर्वी हा विचार जरूर करा By हेमंत बावकर | Published: April 3, 2019 02:28 PM2019-04-03T14:28:29+5:302019-04-03T16:26:52+5:30Join usJoin usNext रंगांची उधळण झाल्यानंतर काळ येतो तो प्रचंड उकाड्याचा. उन्हाचा पारा वाढल्याने गरमीमुळे झोपही लागत नाही. अशावेळी एसी घेण्याचा विचार येतो. पण एसीचे लाईट बिल फार येते असे बरेचजण म्हणतात. हे खरेही आहे पण जर तुमची खरेदी चुकली तरच. म्हणजे आपल्या गरजेनुसार एसी करेदी न केल्यास नंतर पश्चातापाची वेळ येते. यामुळे आम्ही तुमच्यासाठी खास काही टीप्स घेऊन आलो आहोत. विंडो एसीचा जमाना कधीच गेला. आता याची जागा भिंतीवर स्थिर ठेवता येणाऱ्या स्प्लिट एसीने घेतली आहे. आतातर कूलरसारखा एसीही आला आहे. हा एसी भिंतीवर ठेवण्याची गरज नाही. तो कुलरसारखा कुठेही ठेवता येतो. याकडे आपण न जाता आपल्या गरजेनुसार कोणता एसी फायद्याचा हे पाहुयात. 1 स्टार, 3 स्टार म्हणजे काय एसी किती वीज खर्च करतो हे पाहण्यासाठी त्याला स्टार रेटींग असते. 1 ते 5 स्टार असे त्याचे वर्गीकरण असते. 1 स्टार म्हणजे जरा जास्त वीज लागते. तर 5 स्टार म्हणजे कमी वीज वापरणारे रेटिंग असते. ते एसईईआर या भारतीय प्रमाणानुसार नोंदवलेले असते. आज AC 20 हजारापासून उपलब्ध आहेत. मात्र, यामध्ये अॅल्यूमिनिअम आणि कॉपर कंडेन्सर असा प्रकार असतो. अॅल्यूमिनिअम की कॉपर? अॅल्यूमिनिअम कंडेन्सर असल्यास तो जास्त खर्चिक असतो. म्हणजे अॅल्यूमिनिअम फिन तुटल्यास ती पूर्ण बदलावी लागते. तर कॉपरची फिन तुटल्यास ती शोल्डर करून जोडता येते. यामुळे स्टार रेटिंगनंतर कॉपरचा एसी घ्यावा. स्टार रेटिंगनुसार एसीची किंमत वाढत जाते. पण एकदा घातलेला पैसा चांगल्या एसीवर असल्यास त्याचे फायदे हे वीज बिल आल्यानंतर समोर येतात. रेग्युलर की इन्हर्टर? बऱ्याच जणांचा असा समज असतो की इन्हर्टर एसी म्हणजे तो घरात वीज गेली की साठवलेली वीज वापरण्यासाठी असलेल्या इन्हर्टरवर चालतो. हा समज चुकीचा आहे. इन्हर्टर एसी म्हणजे तुमच्या गरजेचे तापमान सेट केले की ते कायम ठेवून कंडेन्सर सारखा चालू बंद ठेवण्यासाठी लागणारी वीज वाचवणे होय. रेग्युलर एसी पेक्षा स्टार रेटिंगनुसार इन्हर्टर एसी 15 टक्के कमी वीज वापरतो. यामुळे इन्हर्टर एसी पर्याय चांगला. हा एसी 30 ते 50 हजारच्या रेंजमध्ये मिळतो. खोलीच्या साईजनुसार किती टनाचा एसी घ्यावा एसी घ्यायला गेला की ते टनात मोजले जातात. एक टन, दीड टन. हे वजन नाही. तर हा एसी किती बीटीयू उष्णता बाहेर काढू शकतो यावरून मोजले जाणारी त्याची क्षमता होय. 1 टन म्हणजे 12 हजार बीटीयू उष्णता. यामुळे 100-120 स्के. फूट खोली असल्यास त्यासाठी 1 टन एसी उपयोगी ठरतो. तर 120 ते 180 स्के. फूट खोली असल्यास 1.5 टन आणि 180 स्के. फूट पेक्षा जास्त मोठी खोली असल्यास 2 टनाचा एसी घ्यावा. 1.2 टनाचा एसीही बाजारात मिळतो. हा एसी 120 ते 150 स्के. फूट खोली असल्यास उपयुक्त ठरतो.सूर्यप्रकाशही विचारात घ्यावा... महत्वाचे म्हणजे केवळ टनाचा विचार न करता तुमच्या खोलीवर किती सूर्यप्रकाश पडतो याचाही विचार करावा. जर खोलीच्या भिंती जास्त तापत असतील तर आणि तुमची खोली 100 स्के. फूट असेल तर थोडा जादा टनाचा एसी घ्यावा. कारण उष्णता जास्त असल्यास कमी टनाचा एसी जास्तीचा वापरला गेल्याने वीज वाढू शकते. शिवाय तुम्हाला थंड हवाही मिळणार नाही. टॅग्स :एसी लोकलसमर स्पेशलAC localSummer Special