पॉपअप कॅमेरा असलेले फोन कोणते? पाहा फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 17:40 IST2019-03-28T17:30:45+5:302019-03-28T17:40:12+5:30

बाजारात नाविण्यपूर्ण स्मार्टफोन आणण्यासाठी कंपन्या काही ना काही वेगळेपण आणण्याच्या प्रयत्नात असतात. सुरुवातीच्या काळात नोकियाने फ्लिपचे मोबाईल आणले होते. सेल्फीसाठी डिस्प्लेची बाजू सरकवावी लागत होती. आता पुन्हा तो काळ आला आहे. काही मोबाईलचा सेल्फी कॅमेरा गायब असतो. मात्र, सेल्फी काढायचा असल्यास तो काही क्षणात बाहेर येतो. आज आम्ही असेच काही फोन तुमच्या माहितीसाठी घेऊन आलो आहोत.
शाओमी Mi Mix 3 5G
शाओमीच्या या फोनमध्ये स्लायडिंग कॅमेरा देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सल प्रायमरी आणि 12 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आहेत. सेल्फीसाठी 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे.
शाओमी Mi Mix 3
या फोनमध्ये स्लायडिंग कॅमेरा आहेत. पॅनलवर दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचले दोन रिअर कॅमेरे आणि सेल्फीसाठी 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे.
Oppo-F11-Pro
ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये स्लायडिंग कॅमेरा देण्यात आले आहेत. पाठीमागे 16 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 20 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आहे. तर पुढे सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Oppo-Find-X
हॉनर मॅजिक 2 मध्येही स्लायडिंग कॅमेरे देण्यात आले आहेत. पाठीमागे तीन कॅमेरे 16, 24 आणि 16 असे आहेत. तर पुढील बाजुलाही तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. 16, 2 आणि 2 असा सेटअप आहे.