तुमच्या मोबाईलमधील हा काळा डाग... कधी वापर केलाय, अनेकांना माहितीही नसेल हे फिचर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:56 PM2024-08-05T12:56:07+5:302024-08-05T13:00:59+5:30

Use Mobile As Remote Control: तुम्ही अनेक फिचर्स असलेले स्मार्टफोन वापरत असाल पण ही फिचर्स काय कामाची आहे, किती फायद्याची आहेत हे अनेकांना माहिती नसते.

तुम्ही अनेक फिचर्स असलेले स्मार्टफोन वापरत असाल पण ही फिचर्स काय कामाची आहे, किती फायद्याची आहेत हे अनेकांना माहिती नसते. फोन घेताना त्याच्या डिस्क्रीप्शनमध्ये हे सर्व लिहिलेले असते. परंतू, ते वापरते कोण? आम्ही तुम्हाला असे एक फिचर सांगणार आहोत की ते तुमचे आयुष्य सोपे करू शकेल.

तुमच्या फोनवर एक थोडा मोठा काळा डागासारखा दिणारा सेन्सर असतो. तो काय असतो. आयआर ब्लास्टर म्हणजे काय, त्याचा वापर कशासाठी करता येतो. या आयआर ब्लास्टरमुळे तुम्ही तुमचा फोन तुमच्या घरातील जवळपास सर्व उपकरणांसाठी रिमोट कंट्रोल म्हणून वापर करू शकता.

घरात टीव्ही, फॅन, साऊंड सिस्टीम, डीटीएच असे किती रिमोट असतात. या सर्वांचा एकच रिंमोट तुम्हाला मिळाला तर? तुमचा मोबाईल तुमच्या उपकरणांचा रिमोट बनू शकतो.

आयआर ब्लास्टर म्हणजे काय? आयआरचे पूर्ण नाव इन्फ्रारेड असे आहे. ही लाईट डोळ्यांना न दिसणारी असते व काही दूरवरून ती कम्युनिकेशनसाठी वापरली जाते. ही लाईट तयार करणारा तो आयआर ब्लास्टर.

जेव्हा तुम्ही फोनवर रिमोट कंट्रोल अॅप उघडता तेव्हा तुमच्या टीव्ही, एसी, फॅन सारख्या डिव्हाईसची फ्रिक्वेन्सी मॅच करावी. या ब्लास्टरद्वारे तो सिग्नल लाईटमधून उपकरणाला पाठविला जातो. तो मॅच झाल्या नंतर तुम्ही तुमचा फोन रिमोट कंट्रोल म्हणून वापरू शकता.

याद्वारे तुम्ही आवाज वाठविणे, कमी करणे, चालू बंद करणे, एसीचे कुलिंग वाढविणे कमी करणे आदी गोष्टी आरामात करू शकता.